IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

India vs New Zealand, 3rd T20I Live : प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:28 PM2023-02-01T19:28:40+5:302023-02-01T19:29:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd T20I Live : Bat or pad? Pad according to the third umpire and out with the ball clipping the bails,  Michael Bracewell gets the breakthrough, Ishan Kishan Out, IND - 14/1 Video  | IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यातील निर्णायक सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, पृथ्वी शॉ याला तिन्ही सामन्यात बाकावरच बसवून ठेवले गेले. फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करत उम्रान मलिकला संधी दिली गेली. मागील सामन्यात युझवेंद्रने भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला होता आणि आज त्याला बाहेर केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. 

युझवेंद्र चहलने दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नोंदवला; आज हार्दिकने त्याला बाहेर केला

 


आयपीएलची फायनल येथे खेळलो होतो तेव्हा चेंडू दुसऱ्या डावात खूपच डिप राहिलेला दिसला.  ही खेळपट्टी मस्त आहे आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी करावीशी वाटली. दोन आव्हानात्मक खेळपट्टींवर खेळल्यानंतर आज फलंदाजांची  कामगिरी कशी होते, यावर सर्वांचे लक्ष आहे. हार-जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु यातून शिकत राहायला हवं. ही खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे उम्रानला युझवेंद्रच्या जागी संधी दिली आहे, असे हार्दिक म्हणाला.

प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. बांगलादेशमध्ये वन डेत द्विशतक झळकावल्यानंतर इशानची बॅट त्याच्यावर रुसलेली पाहायला मिळतेय. ब्रेसवेलने टाकलेला चेंडू इशानला समजला नाही अन् तो पॅडवर आदळला.. LBW ची जोरदार अपील झाले अन् मैदानावरील अम्पायरने OUTचा हात उचलला.   त्यानंतर शुभमन गिलशी चर्चा करून इशानने DRS घेतला. त्यात चेंडू बॅड अन् पॅड यांच्या जवळून जाताना एकाच वेळी  अल्ट्रा एजमध्ये रेषा वरखाली होताना दिसल्या. काहींच्या मते चेंडू आधी बॅटला लागला, पण तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. इशानला १ धावेवर माघारी जावे लागले. भारतीय चाहते या निर्णयावर प्रचंड नाराज दिसले.


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live : Bat or pad? Pad according to the third umpire and out with the ball clipping the bails,  Michael Bracewell gets the breakthrough, Ishan Kishan Out, IND - 14/1 Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.