IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला 

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीतील विजयाची औपचारिकता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 10:18 AM2021-12-06T10:18:27+5:302021-12-06T10:19:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd Test Live Updates : India wins their 14th consecutive Test series at home, thumping 372-run victory, take the series 1-0 | IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला 

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीतील विजयाची औपचारिकता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केली. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभवाच्या दिशेनं ढकलले होतेच, त्यात चौथ्या दिवसात जयंत यादवनं  ( Jayant Yadav) न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला.  

भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजी करताना ७ बाद २७६ धावांवर  दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम ( ६), विल यंग ( २०) व रॉस टेलर ( ६) यांना आर अश्विननं माघारी पाठवून किवींना मोठे धक्के दिले. हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली , परंतु अक्षर पटेलनं ही जोडी तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर माघारी जावं लागलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलनं घाई केली आणि त्यालाही भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं.   

चौथ्या दिवशी जयंत यादवनं करिष्मा दाखवला. त्यानं दिवसाची पहिली विकेट राचिन रविंद्रनं घेतली. राचिन १८ धावांवर चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद होऊन माघारी परतला. त्यापाठोपाठा कायले जेमिन्सन ( ०) व टीम साऊदी ( ०) यांनाही जयंतनं विकेट घेत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले. विलियम सोमरविले ( १) यादवच्या गोलंदाजीवर फसला. हेन्री निकोल्स नॉन स्ट्रायकर एंडला विकेट्स पडताना पाहत होता. अश्विननं त्याची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. 


India home Test series since 2013:

Won 4-0 v AUS
Won 2-0 v WI
Won 3-0 v SA
Won 3-0 v NZ
Won 4-0 v ENG
Won 1-0 v BAN
Won 2-1 v AUS
Won 1-0 v SL
Won 1-0 v AFG
Won 2-0 v WI
Won 3-0 v SA
Won 2-0 v BAN
Won 3-1 v ENG
Won 1-0 v NZ

Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Updates : India wins their 14th consecutive Test series at home, thumping 372-run victory, take the series 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.