IND vs NZ, 1st Test : पदार्पणात शतकानंतरही श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून होईल संघाबाहेर?, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे वाढले टेंशन, जाणून घ्या कारण 

India vs New Zealand, 1st Test : मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरनं कानपूर कसोटीत पदार्पण करताना १०५ धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:50 PM2021-11-26T14:50:44+5:302021-11-26T14:51:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st Test: Will Shreyas Iyer be out of the team in the second Test even after his debut century ?; Know the reason | IND vs NZ, 1st Test : पदार्पणात शतकानंतरही श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून होईल संघाबाहेर?, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे वाढले टेंशन, जाणून घ्या कारण 

IND vs NZ, 1st Test : पदार्पणात शतकानंतरही श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून होईल संघाबाहेर?, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे वाढले टेंशन, जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st Test : मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत पदार्पण करताना १०५ धावांची खेळी केली. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांनीही अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे  अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पण, शतकानंतरही त्याचे दुसऱ्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित नाही.

श्रेयस अय्यरनं १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावा केल्या. भारताकडून कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे पहिले फलंदाज हे लाला अमरनाथ होते. त्यांनी १९३३मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.  श्रेयसच्या आधी पृथ्वी शॉने २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १३४ आणि रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावा केल्या होत्या.  श्रेयसच्या या शतकानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचं टेंशन वाढलं आहे.  हे अनुभवी फलंदाज वारंवार अपयशी ठरले आहेत आणि त्यामुळे श्रेयसच्या रुपानं त्यांना तगडा  स्पर्धक मिळाला आहे. त्यामुळे जर श्रेयसला संघात कायम ठेवायचे असेल, तर यापैकी एका खेळाडूला बाहेर बसवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे.

मार्च २०१३मध्ये शिखर धवननं पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत  १८७ धावा चोपल्या होत्या. भारताकडून पदार्पणात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे. त्यानं १७४ चेंडूंचा सामना करताना ३३ चौकार व २ षटकार खेचले होते. पण, त्याला पुढच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.  क्षेत्ररक्षण करताना त्याचे बोट फ्रॅक्चर झाले होते.  त्याच्या व्यतिरिक्त १४ असे खेळाडू आहेत, ज्यांना पदार्पणाच्या कसोटीत शतकानंतर पुढील कसोटीत खेळण्याची संधी मिळालेली नाही.

सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांनीही पदार्पणात शतक झळकावले आहे. पण, पदार्पणात शतक झळकावून टीम इंडियासाठी धावांचा डोंगर उभा करणे फायद्याचे ठरलेले नाही. आतापर्यंत  भारताला असे चारच सामने जिंकता आले आहेत, तर ३ मध्ये पराभव पत्करावा लागला. ८ सामने अनिर्णीत राहिले आहेत.  

श्रेयसला दुसऱ्या कसोटीत संधी मिळणे अवघड  
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहली दुसऱ्या कसोटीत संघात परतणार आहे आणि त्याच्या आगमनामुळे श्रेयसला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. तसे नसेल करायचे तर  पुजाराला बाहेर बसवले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

श्रेयस अय्यरनं कसोटी पदार्पणात केला विक्रम, असा पराक्रम करणारा ठरला १६वा भारतीय

श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान

खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे IPL, T20 World Cup स्पर्धेला मुकला, पण नाही खचला; आज श्रेयस अय्यरनं इतिहास रचला 

Web Title: IND vs NZ, 1st Test: Will Shreyas Iyer be out of the team in the second Test even after his debut century ?; Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.