Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

Virat Kohli News : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात देत भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:44 AM2021-03-29T07:44:37+5:302021-03-29T07:45:24+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng: Virat Kohli anger over Shardul Thakur not get Man of the Match and Bhubaneswar not get the Man of the Series award | Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात देत भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने गोलंदाजांना दिले आहे. तसेच या सामन्यात चांगली कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर ( Shardul Thakur) आणि संपूर्ण मालिकेमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार (Bhubaneswar Kumar)याला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. (Virat Kohli anger over Shardul Thakur not get Man of the Match and Bhubaneswar not get the Man of the Series award )

रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने झुंजार खेळ केला. मात्र अखेरच्या क्षणी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या सॅम करणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर पहिल्या दोन सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. 

दरम्यान, सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ते सामना अटीतटीचे होतात. सॅम करणने खूप चांगली खेळी केली. मात्र आमच्या गोलंदाजांनी सातत्याने बळी टिपले. तसेच शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही झेल सोडले, ही बाब निराशाजनक होती. मात्र असे असले तरी अखेरीस आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मात्र शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. सर्वात जास्त श्रेय हे गोलंदाजांनाच आहे कारण त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 

तर इंग्लंडचा हंगामी कर्णधार जोस बटलर म्हणाला की, या दौऱ्याचा अनुभव आम्हाला विश्वचषकामध्ये उपयोगी येणार आहे. भारतात यावर्षी टी-२० विश्वचषक तर २०२३ मध्ये क्रिकेट विश्वचषक होणार आहे. रविवारी झालेला सामना उत्तम होता. दोन्ही संघांनी काही चुका केल्या. मात्र क्रिकेटही चांगले खेळले. करनच्या जबरदस्त खेळीमुळे आम्ही आव्हानाच्या जवळ पोहोचलो मात्र अखेरीच भारताने बाजी मारली, त्यांना शुभेच्छा, असे जोस बटलर म्हणाला.  

Web Title: Ind vs Eng: Virat Kohli anger over Shardul Thakur not get Man of the Match and Bhubaneswar not get the Man of the Series award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.