Ind vs Eng: बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा

भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:02 PM2021-02-10T13:02:06+5:302021-02-10T13:04:37+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng I dont know who will go out but Washington Sundar will definitely in the team says Sunil Gavaskar | Ind vs Eng: बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा

Ind vs Eng: बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडीमध्ये कोणतीही चूक झालेली नसल्याचा दावा याआधीच कर्णधार विराट कोहलीनं केलाय. पण आता दुसऱ्या कसोटीसाठी संघ निवडीबाबत विचारमंथन केलं जाऊ शकतं, असं एकंदर चित्र निर्माण झालं आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात संधी देण्याची मागणी अनेक जण करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दुसऱ्या कसोटीसाठी एका भारतीय खेळाडूला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. (India vs England Chennai Test Sunil Gavaskar Supports Washington Sundar)

... तर विराट कोहलीनंही ठोकल्या असत्या २५० धावा; कर्णधाराच्या बचावासाठी माजी खेळाडूची बॅटिंग

सुनील गावस्कर यांनी वॉशिंग्टन सुंदरचं (Washington Sundar) तोंडभरुन कौतुक केलं आहे. "पहिल्या कसोटीनंतरची पत्रकार परिषद पाहता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात फक्त एकच बदल होईल असं वाटतं. कारण सध्यातरी कोणतेही मोठे बदल करण्याची गरज नसल्याचं मला वाटतं. सध्याचा संघ उत्तम आहे. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं, पण हे असं होत असतं. सामन्यासाठी नाणेफेक किती महत्वाची होती याबाबत आपण याआधीच चर्चा केली आहे", असं गावस्कर म्हणाले. 

अश्विन आणि सुंदरच्या गोलंदाजीत मोठा फरक
"वॉशिंग्टन सुंदरनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केलीय ती नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. त्याला फक्त आणखी जास्त गोलंदाजी करू द्यायला हवी. सुंदरला टी-२० क्रिकेटमधील गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. जिथं तुम्हाला चेंडूला वेग ठेवावा लागतो. त्यामुळेच कसोटीमध्ये हवेत चेंडूला वळवणं त्याला कठीण जात आहे. पण अश्विनचं तसं नाहीय. अश्विनसोबत गोलंदाजी करुन वॉशिंग्टनला खूप शिकता येईल आणि त्याच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा होईल. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड निश्चित आहे. संघातून कोण बाहेर जाईल? हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल", असं सुनील गावस्कर म्हणाले. 

Web Title: Ind vs Eng I dont know who will go out but Washington Sundar will definitely in the team says Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.