IND vs ENG: शार्दुलनं ठोकलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक्; थेट शार्दुलची बॅटच तपासली!

India vs England, Shardul Thakur शार्दुलनं ३ खणखणीत षटकार ठोकले. शार्दुलनं ठोकलेल्या एका षटकारानंतर एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:59 PM2021-03-28T17:59:48+5:302021-03-28T18:00:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Ben Stokes surprised by Shardul thakur six Checked Sharduls bat | IND vs ENG: शार्दुलनं ठोकलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक्; थेट शार्दुलची बॅटच तपासली!

IND vs ENG: शार्दुलनं ठोकलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक्; थेट शार्दुलची बॅटच तपासली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाकडून रिषभ पंतनं सर्वाधिक ७८ धावांचं योगदान दिलं. तर शिखर धवन (६७), हार्दिक पंड्या (६४) यांनी अर्धशतकी खेळी साकारली. शार्दुल ठाकूरनं या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत २१ चेंडूत ३० धावा केल्या. यात  शार्दुलनं ३ खणखणीत षटकार ठोकले. शार्दुलनं ठोकलेल्या एका षटकारानंतर एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

IND vs ENG: रिषभ पंत पुन्हा चमकला; भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान

शार्दुल ठाकूरनंबेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर फ्रंट फूटवर येऊन एक खणखणीत षटकार ठोकला. शार्दुलनं लगावलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक् झाला आणि नॉन स्ट्राइकवर शार्दुल येताच मिश्किलपणे त्याची बॅट स्टोक्स तपासून पाहू लागला. शार्दुलनंही मिश्किल हास्य करत स्टोक्सच्या हातात त्याची बॅट देऊ केली. 

IND vs ENG: षटकारांची उधळण! भारत वि. इंग्लंड वनडे मालिकेत आजवरचे सर्वाधिक षटकार

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली तर रिषभ आणि हार्दिक पंड्यानं ९९ धावांची भागीदारी केली. पण पाच फलंदाज बाद झाल्यानंतर शार्दुल आणि कृणाल पंड्या यांच्या खांद्यावर संघाच्या धावसंख्येला ३०० च्या पार नेण्याची जबाबदारी आली. शार्दुलनं २१ चेंडूत ३० धावा केल्या, तर कृणाल पंड्यानं २५ धावांचं योगदान दिलं. 
 

Web Title: IND vs ENG Ben Stokes surprised by Shardul thakur six Checked Sharduls bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.