Jasprit Bumrah, IND vs ENG 5th Test : 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1...; जसप्रीत बुमराहची 'युवी' स्टाईल फटकेबाजी, Stuart Broad च्या एकाच षटकात कुटल्या 35 धावा 

India vs England 5th Test : रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 04:30 PM2022-07-02T16:30:16+5:302022-07-02T16:34:00+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test : Stuart bowled the most expensive over in Test cricket history - 35 runs, Jasprit Bumrah scored 29 runs in a single over, Video | Jasprit Bumrah, IND vs ENG 5th Test : 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1...; जसप्रीत बुमराहची 'युवी' स्टाईल फटकेबाजी, Stuart Broad च्या एकाच षटकात कुटल्या 35 धावा 

Jasprit Bumrah, IND vs ENG 5th Test : 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1...; जसप्रीत बुमराहची 'युवी' स्टाईल फटकेबाजी, Stuart Broad च्या एकाच षटकात कुटल्या 35 धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test : रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली. 5 बाद 98 अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ व जडेजा ही जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची विक्रमी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले. पण, खरी फटकेबाजी कर्णधार जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ( Stuart Broad) एका षटकात 29 धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. जसप्रीतची फटकेबाजी पाहून महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याला युवराज सिंगची आठवण झाली आणि त्याने खास ट्विटही केले. ब्रॉडच्या त्या षटकात एकूण 35 धावा आल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ते सर्वात महागडे षटक ठरले. 


रिषभच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या जडेजाने शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीनेही सुरेख फटके मारताना त्याला  चांगली साथ दिली. 92 धावांवर असताना जडेजाचा दुसऱ्या स्लिपमध्ये झेल सुटला अन् तो चेंडू चौकार गेला. त्यानंतर आणखी एक चौकार मारून त्याने शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक अन् इंग्लंडविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. जसप्रीत बुमराहने ( jasprit bumrah) अखेरच्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी करताना भारताची धावसंख्या 416 पर्यंत नेली. 

रिषभने 111 चेंडूंत 19 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 146 धावा केल्या. रिषभ पंतने 89 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये भारताकडून हे दुसरे जलद शतक ठरले. दुसऱ्या दिवशी जडेजा व मोहम्मद शमी यांनी दमदार खेळ करताना सुरेख फटके मारले. 70 चेंडूंत 48 धावांची ही भागीदारी स्टुअर्ट ब्रॉडने संपुष्टात आणली. शमी ( 16) ची विकेट घेत ब्रॉडने कसोटीत 550 वा बळी टिपला.  त्यानंतर जडेजाची विकेट पडली. जेम्स अँडरसनने भन्नाट यॉर्कर टाकून ही विकेट मिळवली. जडेजा 194 चेंडूंत 13 चौकारांसह 104 धावांवर बाद झाला.   

भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. जेम्स अँडरसनने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. 84व्या षटकात जसप्रीतने कहर केला. ब्रॉडच्या त्या षटकात 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1 अशा एकूण 35 धावा आल्या. कसोटी क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक ठरले. जसप्रीतची फटकेबाजी पाहून ब्रॉडला 2007 साली युवराज सिंगने दिलेला झटका आठवला असेल. युवीने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये सहा षटकार खेचून 36 धावा चोपल्या होत्या. 

पाहा व्हिडीओ.. 

 

Read in English

Web Title: IND vs ENG 5th Test : Stuart bowled the most expensive over in Test cricket history - 35 runs, Jasprit Bumrah scored 29 runs in a single over, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.