IND vs ENG, 4th Test : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; विराट कोहलीची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी

ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) सुरुवात होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 4, 2021 09:18 AM2021-03-04T09:18:10+5:302021-03-04T09:19:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th Test : England won the toss and decided to bat first, Virat Kohli equal MS Dhoni Record | IND vs ENG, 4th Test : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; विराट कोहलीची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; विराट कोहलीची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind vs Eng 4th test Live score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) सुरुवात होत आहे. मालिका वाचवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाच्या नाणेफेकीचा कौल पडला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं आजच्या सामन्यासाठी एक अतिरिक्त फलंदाजासह दोन बदल केले आहेत, तर टीम इंडियात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या जागी मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. याचा अर्थ उमेश यादवला ( Umesh Yadav) बाकावरच बसून रहावे लागणार आहे. आजच्या सामन्यासाठी मैदानावर उतरताच विराट कोहलीनं ( Virat Kohli) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ind vs eng 4th test

भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारे कर्णधार
विराट कोहली - ६०*
महेंद्रसिंग धोनी - ६०
सौरव गांगुली - ४९
मोहम्मद अझरुद्दीन - ४७
सुनील गावस्कर - ४७  


 इंग्लंड - डॉम सिब्ली, झॅक क्रॅव्ली, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, डॉम बेस, जॅक लिच, जिमी अँडरसन
भारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा मोहम्मद सिराज  

Web Title: IND vs ENG, 4th Test : England won the toss and decided to bat first, Virat Kohli equal MS Dhoni Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.