IND vs ENG, 4th Test : खेळपट्टीवरील टीकेवरून विराट कोहली भडकला; इंग्लंड अन् टीकाकारांना बरोबर सुनावलं

Virat Kohli, india's success lies in not cribbing भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला गुरुवारपासून सुरूवात होणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 3, 2021 03:41 PM2021-03-03T15:41:14+5:302021-03-03T15:46:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th Test : Angry Virat Kohli takes a dig at england, Say 'india's success lies in not cribbing' | IND vs ENG, 4th Test : खेळपट्टीवरील टीकेवरून विराट कोहली भडकला; इंग्लंड अन् टीकाकारांना बरोबर सुनावलं

IND vs ENG, 4th Test : खेळपट्टीवरील टीकेवरून विराट कोहली भडकला; इंग्लंड अन् टीकाकारांना बरोबर सुनावलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देनरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्यापासून सुरू होतेय चौथी कसोटीतिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर खेळपट्टीवरून सुरू झालेला वादन्यूझीलंडमध्ये दोन दिवसांत आम्ही हरलो, तेव्हा कुणी टीका केली नाही- विराट कोहली

India vs England, 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला गुरुवारपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) हा सामना खेळवण्यात येणार आहे. याच स्टेडियमवर झालेला तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत संपल्यानं खेळपट्टीवर टीका होत आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीची चर्चा जोरात सुरू आहे. त्यावरून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इंग्लंडच्या संघाला आणि टीकाकारांना चांगलंच सुनावलं. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. IPL 2021 Venues : आयपीएल सामन्यांच्या ठिकाणांवरून फ्रँचायझी नाराज; मुख्यमंत्र्यांची BCCIकडे विनंती 

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला,'' टीकाकारांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही पाच दिवस कसोटी सामना खेळावा की जिंकण्यासाठी? सामना जिंकणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे आणि सामन्या दरम्यान काय चर्चा होतात त्याकडे आमचे लक्ष नसते. आम्ही देशात-परदेशात यश मिळवले आहेत. आम्ही कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार नकरता खेळतो आणि हे यशामागचं कारण आहे.''

''काही लोकांकडून उगीच टीका व आरडाओरड केली जात आहे. दोन दिवसात सामना संपला त्यासाठी एवढी टीका करण्याचं कारण काय? न्यूझीलंडमध्ये आम्हीही दोन दिवसांत हरलो होतो. तेव्हा टीका झाली नाही. मग आता का? स्पोर्टी विकेटवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मला असे प्रश्न विचारा. फिरकीला पोषक खेळपट्टीवर नेहमीच टीका केली जाते. ही नाण्याची एक बाजू आहे,''असेही विराट म्हणाला.

चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल?
चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आणि ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.     तिसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला जास्त षटकं टाकण्याची संधी मिळाली नाही. त्याच्याजागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावू शकतो. कुलदीप, आर अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह संघ मैदानावर उतरणार आहे. IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

भारतीय संघ ( Playing XI) - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश यादव.

Web Title: IND vs ENG, 4th Test : Angry Virat Kohli takes a dig at england, Say 'india's success lies in not cribbing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.