IND vs ENG, 4th T2O: तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती; सूर्यकुमार यादवला बाद दिल्यानं वीरू भडकला

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:39 PM2021-03-18T20:39:36+5:302021-03-18T20:40:06+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O :  Third umpire while making that decision, Virender Sehwag react on Suryakumar yadav Wicket | IND vs ENG, 4th T2O: तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती; सूर्यकुमार यादवला बाद दिल्यानं वीरू भडकला

IND vs ENG, 4th T2O: तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती; सूर्यकुमार यादवला बाद दिल्यानं वीरू भडकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं खणखणीत षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्या आगमनाची झलक दाखवली. पण, त्याच्या विकेटवरून नवा वाद निर्माण झाला.  भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती, असं ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई इंडियन्स व वासीम जाफर हेही भडकले.  Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. ( 50s in Maiden T20I inning for India) रॉबीन उथप्पा ( वि. पाकिस्तान, २००७), रोहित शर्मा ( वि. दक्षिण आफ्रिका, २००७), अजिंक्य रहाणे ( वि. इंग्लंड, २०११), इशान किशन ( वि. इंग्लंड, २०२१) यांनी असा पराक्रम केला आहे. पण, ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून तो ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला.  Ind Vs Eng T20 Match Today


सूर्यकुमारनं दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ४२ ( २७ चेंडू) आणि चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसह ४० ( २८) धावांची भागीदारी केली. 
पाहा कोण काय म्हणाले...


Web Title: IND vs ENG, 4th T2O :  Third umpire while making that decision, Virender Sehwag react on Suryakumar yadav Wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.