IND vs ENG, 4th T2O Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या विकेट्सवरून सुरू झाला वाद, टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडची लावली वाट!

IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav’s breathtaking knock and controversial dismissal, England need 186 runs to win : सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:04 PM2021-03-18T21:04:33+5:302021-03-18T21:05:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav’s breathtaking knock and controversial dismissal, England need 186 runs to win | IND vs ENG, 4th T2O Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या विकेट्सवरून सुरू झाला वाद, टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडची लावली वाट!

IND vs ENG, 4th T2O Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या विकेट्सवरून सुरू झाला वाद, टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडची लावली वाट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं खणखणीत षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्या आगमनाची झलक दाखवली. पण, त्याच्या विकेटवरून नवा वाद निर्माण झाला. रिषभ पंत ( Rishabh Pant) व श्रेयस अय्यर ( shreyas Iyer) यांनी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. भारतानं २० षटकांत ८ बाद १८५ धावा केल्या. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती; सूर्यकुमार यादवला बाद दिल्यानं वीरू भडकला

सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. ( 50s in Maiden T20I inning for India) रॉबीन उथप्पा ( वि. पाकिस्तान, २००७), रोहित शर्मा ( वि. दक्षिण आफ्रिका, २००७), अजिंक्य रहाणे ( वि. इंग्लंड, २०११), इशान किशन ( वि. इंग्लंड, २०२१) यांनी असा पराक्रम केला आहे. पण, ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून तो ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला.  Ind Vs Eng T20 Match Today OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

सूर्यकुमारनं दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ४२ ( २७ चेंडू) आणि चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसह ४० ( २८) धावांची भागीदारी केली. रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांची १८ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरनं संपुष्टात आणली. रिषभ ३० धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या ११ धावांवर बाद झाला, बेन स्टोक्सनं सुपरमॅन कॅच घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर १८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर बाद झाला. 

 

Web Title: IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav’s breathtaking knock and controversial dismissal, England need 186 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.