Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

Ind Vs Eng 2021 3rd test pink ball live score Ishant Sharma : भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 02:45 PM2021-02-24T14:45:02+5:302021-02-24T14:46:01+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 3rd Test Live  : Ishant Sharma become a fifth players who have been part of 100 or more Tests without playing a single ODI World Cup game | Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Score :  अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आजपासून सुरू झाला. भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या पिंक बॉल कसोटीत ( Ind vs Eng Pink Ball Test) पाहुणा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं संघात चार बदल केले आहेत, तर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दोन बदल पाहायला मिळत आहेत. हा सामना भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. पण, याचसोबत एका विचित्र विक्रमाच्या यादीतही इशांतचं नाव नोंदवलं गेलं. ( Ind vs Eng, Ind Vs Eng Live Match) 


इशांत शर्माला २००६-०७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेवेळी भारतीय संघात बोलावण्यात आले होते. मात्र त्याचे कसोटी पदार्पण झाले ते २५ मे २००७ पासून बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीमधून. त्यानंतर पुढचे सहा महिने त्याची भारतीय संघात ये जा सुरू होती.  इशांतच्या धारदार गोलंदाजीला खरी ओळख मिळाली ती २००७-०८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेमधून. २००८ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या कसोटी मालिकेत इशांतने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्या मालिकेत १६ बळी घेत इशांत मालिकावीर ठरला होता. या मालिकेतही इशांतने रिकी पाँटिंगला तीनवेळा बाद केले होते. ( Ind vs Eng Pink Ball Test) 

भारताकडून १०० कसोटी खेळणारा ११ व्या खेळाडूचा मान इशांतला मिळाला. इंग्लंडकडून सर्वाधिक १५ खेळाडूंनी कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केलं आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया ( १३), भारत ( ११), वेस्ट इंडिज ( ९), दक्षिण आफ्रिका ( ८), पाकिस्तान व श्रीलंका (५), न्यूझीलंड ( ४)  या संघाचा क्रमांक येतो. एकही वर्ल्ड कप सामना न खेळता १०० कसोटी सामने खेळणारा इशांत हा जगातला पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी अॅलेस्टर कूक ( Alastair Cook), व्हि व्हि एस लक्ष्मण ( VVS Laxman), कॉलिन कोवड्रे ( Colin Cowdrey) आणि जस्टीन लँगर ( Justin Langer) यांच्या नावावर हा विचित्र विक्रम आहे.


भारताकडून कुणी कधी शंभरावा कसोटी सामना खेळला?
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar - 1984)
दीलिप वेंगसरकर ( D Vengsarkar - 1988) 
कपिल देव ( Kapil Dev -1989) 
सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar - 2002) 
अनिल कुंबळे ( Anil Kumble -2005)
राहुल द्रविड ( Rahul Dravid -2006) 
सौरव गांगुली ( Sourav Ganguly - 2007) 
व्हि व्हि एस लक्ष्मण ( VVS Laxman - 2008) 
वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag - 2012) 
हरभजन सिंग ( Harbhajan Singh - 2013) 

Web Title: Ind vs Eng 3rd Test Live  : Ishant Sharma become a fifth players who have been part of 100 or more Tests without playing a single ODI World Cup game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.