Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

Ind vs Eng 3rd Test : Axar Patel, England are all out नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 06:20 PM2021-02-24T18:20:34+5:302021-02-24T18:21:43+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 3rd Test : 6 for 38 by Axar Patel, England are all out for 112 | Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गडगडला, या मालिकेतील निचांक धावसंख्याअक्षर पटेलनं घेतल्या ६ विकेट्स, तर आर अश्विनच्या नावावर ३ बळी

Ind vs Eng 3rd Test : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मानं ( Ishant Sharma) इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) खेळपट्टीचा मूड पाहताच लगेच फिरकीपटूंना पाचारण केलं. त्याचा हा डाव यशस्वी ठरला अन् अक्षर पटेल ( Axar Patel) व आर अश्विन ( R Ashwin) यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीवर नाचवलं. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत गुंडाळून टीम इंडियानं तिसऱ्या कसोटीची दणक्यात सुरुवात केली. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 


मॅचचे हायलाईट्स
-  अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे.  

- जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. Ind Vs Eng Live Match

- शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मा याचा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो ११वा खेळाडू आहे, तर कपिल देव यांच्यानंतर पहिलाच जलदगती गोलंदाज आहे. टी नटराजननं शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो; नेटिझन्सकडून झाली टीका, कारण जाणून येईल संताप

- इशांत शर्मानं तिसऱ्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ०) याला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवलं. ५० हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

- चेन्नई कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलनं त्यानंतर कमाल दाखवली. त्यानं एकामागून एक धक्के देण्याचे सत्र सुरूच ठेवले. Ind vs Eng Pink Ball test match  शाब्बास शार्दूल! क्रिकेटवरील प्रेमासाठी कारनं केला ७०० किलोमीटर प्रवास; जाणून घ्या कारण

- आर अश्विननं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ( १७) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. झॅक क्रॅव्ली हा एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु पटेलनं त्याला बाद केलं. क्रॅव्लीनं ५३ धावा केल्या.

- जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ऑली पोप हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडची अवस्था आणखी बिकट झाली. भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला.

- स्टुअर्ट ब्रॉडची विकेट घेत अक्षर पटेलनं या कसोटीतही पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डे नाईट कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय, तर जगातला सहावा गोलंदाज ठरला आहे. 

Web Title: Ind vs Eng 3rd Test : 6 for 38 by Axar Patel, England are all out for 112

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.