IND vs ENG, 2nd Test : टीम इंडियाला धक्का; क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाला झाली दुखापत, स्कॅनसाठी नेलं हॉस्पिटलमध्ये  

Shubman Gill, Injury, won't be fielding today : चौथ्या दिवशी डॅन लॉरेन्सच्या रुपानं इंग्लंडला चौथा धक्का बसला. इंग्लंडचे ४ फलंदाज ६६ धावांवर माघारी परतले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 10:32 AM2021-02-16T10:32:40+5:302021-02-16T10:33:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd Test : Shubman Gill Taken for Scans After Forearm Injury; Won't Take Field on Day 4 | IND vs ENG, 2nd Test : टीम इंडियाला धक्का; क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाला झाली दुखापत, स्कॅनसाठी नेलं हॉस्पिटलमध्ये  

IND vs ENG, 2nd Test : टीम इंडियाला धक्का; क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाला झाली दुखापत, स्कॅनसाठी नेलं हॉस्पिटलमध्ये  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test Day 4 : भारतीय संघान दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं कूच केली आहे. आर अश्विननं ( R Ashwin) चौथ्या दिवसाच्या त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे ४८२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचे चार फलंदाज मघारी परतले आहेत. टीम इंडिया विजयाच्या दिशेनं एकेक पाऊल टाकत असताना संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा सलमीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याच्या हाताला दुखापत झाली आहे आणि तो आज क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून BCCI ची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. ( Shubman Gill sustained a blow ) विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?

टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात तीन धक्के बसले होते. चौथ्या दिवसात आर अश्विननं त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ३) व नाइट वॉचमन जॅक लिच ( ०) यांना माघारी पाठवले. अश्विननं दुसरा सलामीवीर रोरी बर्न्स ( २५) याचा अडथळा दूर केला. चौथ्या दिवशी डॅन लॉरेन्सच्या रुपानं इंग्लंडला चौथा धक्का बसला. इंग्लंडचे ४ फलंदाज ६६ धावांवर माघारी परतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाचं 'Miss World'शी लग्न; युवराज सिंगनं घेतली होती दोघांची फिरकी


अश्विनची कमाल...
दरम्यान, कसोटीचा तिसरा दिवस आर अश्विनच्या शतकानं गाजवला. अश्विननं १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावा केल्या. टीम इंडियाकडून ८ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटीत सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये अश्विननं ( ६) हरभजन सिंगला ( ५ अर्धशतकं) मागे टाकले. कपिल देव ८ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहेत. रवींद्र जडेजा व सय्यद किरमानी यांच्या खात्यातही प्रत्येकी ५-५ अर्धशतकं आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये आर अश्विननं ( ३ शतकं) पाकिस्तानच्या कामरान अकमल याच्याशी बरोबरी केली. न्यूझीलंडचा डॅनिएल व्हिटोरी ४ शतकांसह अव्वल स्थानी आहे. आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

Web Title: IND vs ENG, 2nd Test : Shubman Gill Taken for Scans After Forearm Injury; Won't Take Field on Day 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.