IND vs ENG, 2nd T20 : इंग्लंडनं पहिल्या षटकात विकेट गमावली, तरीही टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली

IND vs ENG, 2nd T20 :  वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:50 PM2021-03-14T20:50:54+5:302021-03-14T20:52:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd T20: A strong over from Shardul Thakur to close the innings, India need 165 to win | IND vs ENG, 2nd T20 : इंग्लंडनं पहिल्या षटकात विकेट गमावली, तरीही टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली

IND vs ENG, 2nd T20 : इंग्लंडनं पहिल्या षटकात विकेट गमावली, तरीही टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : पहिल्याच षटकात विकेट पडूनही इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या ट्वेंटी-20 ( India vs England 2nd T20) सामन्यात टीम इंडियाविरुद्ध आव्हानात्मक धावा उभ्या केल्या. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar  Kumar) यानं तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. जेसन रॉय ( Jason Roy) याला अन्य फलंदाजांनी चांगली साथ दिली. इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी चांगला खेळ करताना इंग्लंडला ६ बाद १६४ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या.  Ind Vs Eng 2nd T20, Ind Vs Eng 2nd T20 Live Score

भुवीनं पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरला (०) पायचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर जेसन रॉय व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेवीड मलान यांनी ६४ धावांची भागीदारी करून इंग्लंडची गाडी रूळावर आणली. युझवेंद्र चहलनं ही भागीदारी तोडली आणि मलानला ( २४) बाद केलं. जेसन रॉय ( ४६) व  जॉनी बेअरस्टो ( २०) पाठोपाठ माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदरनं ( Washington Sunder) या दोघांना बाद केलं. इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) भारतीय गोलंदाजांची धुलाई करेल असे वाटत होते, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) त्याचा अडथळा दूर केला. मॉर्गन २८ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सनं २४ धावा केल्या. Ind Vs Eng 2nd T20 Match Today BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन

टीम इंडियाचे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हे दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून (  Ind Vs Eng 2nd T20 Live Score) पदार्पण करणार आहेत. शिखर धवन आणि अक्षर पटेल ( Shikhar Dhawan and Axar Patel out) यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी इशान व सूर्यकुमार या दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ( Ishan Kishan and Suryakumar Yadav in). इशान व लोकेश राहुल ही जोडी आज सलामीला उतरणार आहे. ( Ishan will open with KL Rahul) 

भारतीय संघ (Playing XI): लोकेश राहुल, इशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.

इंग्लंडचा संघ  (Playing XI):  जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद 
 

Web Title: IND vs ENG, 2nd T20: A strong over from Shardul Thakur to close the innings, India need 165 to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.