IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला

IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes scored 76 runs from boundaries बेअरस्टोनंही शतक झळकावले आणि त्याला बेन स्टोक्सची तोलामोलाची साथ मिळाली. खेळपट्टीवर जम बसलेल्या या जोडीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. बेअरस्टोनं वन डे कारकिर्दीतील ११वे शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:50 PM2021-03-26T20:50:13+5:302021-03-26T20:50:35+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes scored 76 runs from 99 through boundaries, Bhuvi breaks the 175-run partnership  | IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला

IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : जेसन रॉय ( Jason Roy)  व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार सुरूवात करून देताना इंग्लंडचा पाया मजबूत केला. बेअरस्टोनंही शतक झळकावले आणि त्याला बेन स्टोक्सची तोलामोलाची साथ मिळाली. खेळपट्टीवर जम बसलेल्या या जोडीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. बेअरस्टोनं वन डे कारकिर्दीतील ११वे शतक झळकावले. स्टोक्स आज भलत्याच फॉर्मात होता आणि त्यात त्याच्यावर अम्पायरची कृपादृष्टी राहिली. त्याचा फायदा उचलताना स्टोक्सनं वादळी खेळी केली. ९९ धावांवर भुवनेश्वर कुमारनं त्याला रिषभ पंतच्या हाती झेलबाद केले. स्टोक्सनं ५२ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करताना ९९ धावा चोपल्या. बेअरस्टोसह दुसऱ्या विकेटसाठी त्यानं ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी केली. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

 

टीम इंडियाच्या फलंदाजांनी दाखवला दम...
लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेशनं चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. विराटही ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर माघारी परतला.  रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा केल्या. विराट व लोकेश यांनी तिसऱ्या विकेटसाठी  १४१ चेंडूंत १२१ धावा,तर रिषभ व लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली.  2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live

इंग्लंडची पुन्हा एकदा शतकी सलामी...
जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडकडून सर्वाधिक १३ शतकी भागीदारीचा विक्रम या दोघांच्या नावावर जमा झाला. ( Jonny Bairstow and Jason Roy ) या दोघांनी इयॉन मॉर्गन व जो रूट ( १२) यांचा विक्रम मोडला. १७व्या षटकात या जोडीचा ताळमेळ तुटला अन् जेसन रॉयला ( ५५) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. या खेळीत त्यानं ७ चौकार व १ षटकार खेचला. रोहित शर्मानं सुरेख फिल्डिंग करताना टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं.  2nd odi ind vs eng Live updates, 2nd odi ind vs eng, 

बेन स्टोक्स OUT or NOT OUT?
बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) बेअरस्टोच्या सोबत इंग्लंडच्या धावांचा वेग वाढवला. २६व्या षटकात कुलदीप यादवच्या डायरेक्ट थ्रोने स्टम्पचा वेध घेतला. पण, स्टोक्सनं तोपर्यंत बॅट क्रीजच्या रेषेवर ठेवली होती. या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आणि तिसऱ्या अम्पायरनं स्टोक्सला नाबाद दिले. या निर्णयावर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) नाखूश दिसला आणि तो मैदानावरील अम्पायरला प्रात्याक्षिक करून दाखवू लागला. ind vs eng Live, 2nd odi ind vs eng

बेन स्टोक्सचा प्रहार, टीम इंडिया बेहाल
खेळपट्टीवर जम बसलेल्या बेन स्टोक्सनं भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यानं बेअरस्टोसह दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत शतकी धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून वन डे क्रिकेटमध्ये केवळ पाचव्यांदाच पहिल्या व दुसऱ्या विकेटनं शतकी भागीदारी झाली आहे. यापूर्वी  २००५ ( वि. ऑस्ट्रेलिया, लिड्स), २०१५ ( वि. पाकिस्तान, अबु धाबी), २०१७ ( वि. वेस्ट इंडिज, साऊदॅम्प्टन) आणि २०१८ ( वि. ऑस्ट्रेलिया, ट्रेंट ब्रिज) मध्ये इंग्लंडनं ही कमाल केली.  

Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes scored 76 runs from 99 through boundaries, Bhuvi breaks the 175-run partnership 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.