Ind vs Eng 1st T20 : विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाचक्की, प्रथमच ओढावली अशी नामुष्की

Ind vs Eng 1st T20 Live : Virat Kohli got out Ducks

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:31 PM2021-03-12T19:31:42+5:302021-03-12T19:32:16+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20 Live : First time Virat Kohli got out for two consecutive Ducks in International Cricket, india lost 2 wickets in 3 runs | Ind vs Eng 1st T20 : विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाचक्की, प्रथमच ओढावली अशी नामुष्की

Ind vs Eng 1st T20 : विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाचक्की, प्रथमच ओढावली अशी नामुष्की

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng T20 Live Update Score : फिरीकपटू आदील राशीदला पहिलं षटक देऊन इंग्लंडनं त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यात जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) माघारी पाठवले. आर्चरच्या त्या षटकात कर्णधार विराट कोहलीलाही ( Virat Kohli) अवघड गेलं. त्यात तिसऱ्या षटकात राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन फलंदाज ३ धावांवर बाद झाले. कोहलीला भोपळाही फोडता आला नाही आणि त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.  ( First time Virat Kohli got out for two consecutive Ducks in International Cricket) 

- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला.

-   ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली.  महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते.

- २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही विराटनं नावावर केला. जॉनी बेअरस्टो, कुसल मेंडिस आणि अॅनरिच नॉर्टझे हेही तीन वेळा भोपळ्यावर बाद झाले आहेत.  

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची विराटची पहिलीच वेळ ठरली. 


रोहित शर्माला विश्रांती ( Rohit Sharma rested) 
रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला सुरुवातीच्या काही सामन्यांत विश्रांती देणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीनं स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलामीला उतरले आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा पाहावी लागेल. टीम इंडियाची Playing XI : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टर सुंदर, शार्दुल ठाकूर.
इंग्लंड : जेसन रॉय, इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, डेवीड मलान, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदील रशीद, मार्क वूड  
 

Web Title: Ind vs Eng 1st T20 Live : First time Virat Kohli got out for two consecutive Ducks in International Cricket, india lost 2 wickets in 3 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.