IND vs BAN 1st ODI : कोणतही कारण देणार नाही! रोहित शर्मानं पराभवाचं कारण सांगताना दिलाय खेळाडूंना इशारा

मेहिदीने नाबाद ३८, तर मुस्ताफिजूरने नाबाद १० धावा करताना बांगलादेशला ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा करून विजय मिळवून दिला. सिराजने तीन, कुलदीप सेन व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:02 PM2022-12-04T20:02:11+5:302022-12-04T20:02:30+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st ODI Live Update : Rohit Sharma said, "we didn't bat well, 186 wasn't good enough, but we did bowl well". | IND vs BAN 1st ODI : कोणतही कारण देणार नाही! रोहित शर्मानं पराभवाचं कारण सांगताना दिलाय खेळाडूंना इशारा

IND vs BAN 1st ODI : कोणतही कारण देणार नाही! रोहित शर्मानं पराभवाचं कारण सांगताना दिलाय खेळाडूंना इशारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ९ बाद १३६ धावांवर असताना आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने (  Mehidy Hasan) अखेरच्या विकेटसोबत झुंज लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.  

लोकेश राहुलची चूक भारताला महागात पडली, रोहित शर्माने शिवी घातली, Video 

शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना पहिल्या वन डे सामन्यात नाक घासायला भाग पाडले. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने चौथी विकेट्स घेताना भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.  शिखर धवन ( ७), रोहित ( २७), विराट ( ९) आणि  श्रेयस अय्यर ( २४) हे झटपट माघारी परतले. लोकेशने वॉशिंग्टन सुंदरसह ( १९)  ६० धावांची भागीदारी केली. शाहबाज अहमद ( ०), शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) या अष्टपैलू खेळाडूंना प्रभाव पाडता आला नाही. लोकेशने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. नजमुल शांतो गोल्डन डकवर बाद झाला. लिटन दास ( ४१) वगळता आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या. ९ बाद १५५ धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन आणि मुस्ताफिजूर रहमना यांनी ५१ धावांची विक्रमी भागीदारी करून भारतावर १ विकेट्स राखून विजय मिळवला. मेहिदीने उत्तुंग फटका मारला अन् लोकेश हा झेल घेईल असे वाटत असताना त्याच्याकडून कॅच सुटला.

मेहिदीने नाबाद ३८, तर मुस्ताफिजूरने नाबाद १० धावा करताना बांगलादेशला ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा करून विजय मिळवून दिला. सिराजने तीन, कुलदीप सेन व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 
रोहित शर्मा म्हणाला, आमची फलंदाजी चांगली झाली नाही. गोलंदाजांनी त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली. ते विकेट घेत होते. पण, ३०-४० धावा अधिक झाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता. काही कारण देणार नाही. अशा खेळपट्टीवर कसे खेळायचे हे शिकायला हवे. आशा करतो की दुसऱ्या सान्यात आम्ही चांगली कामगिरी करू.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

Web Title: IND vs BAN 1st ODI Live Update : Rohit Sharma said, "we didn't bat well, 186 wasn't good enough, but we did bowl well".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.