IND vs BAN 1st ODI : नायक ठरला खलनायक! लोकेश राहुलची चूक भारताला महागात पडली, रोहित शर्माने शिवी घातली, Video 

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 07:42 PM2022-12-04T19:42:45+5:302022-12-04T19:43:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st ODI Live Update : KL Rahul’s expensive drop catch of Mehidy Hasan that cost India 1st ODI against Bangladesh, Rohit Sharma furious, Video   | IND vs BAN 1st ODI : नायक ठरला खलनायक! लोकेश राहुलची चूक भारताला महागात पडली, रोहित शर्माने शिवी घातली, Video 

IND vs BAN 1st ODI : नायक ठरला खलनायक! लोकेश राहुलची चूक भारताला महागात पडली, रोहित शर्माने शिवी घातली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ९ बाद १३६ धावांवर असताना आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने (  Mehidy Hasan) अखेरच्या विकेटसोबत झुंज लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मेहिदीला त्यात लोकेश राहुलवॉशिंग्टन सुंदरने जीवदान दिल्याने रोहित शर्माचा पारा चढला.  

शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना पहिल्या वन डे सामन्यात नाक घासायला भाग पाडले. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने चौथी विकेट्स घेताना भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.  शिखर धवन ( ७), रोहित ( २७), विराट ( ९) आणि  श्रेयस अय्यर ( २४) हे झटपट माघारी परतले. लोकेशने वॉशिंग्टन सुंदरसह ( १९)  ६० धावांची भागीदारी केली. शाहबाज अहमद ( ०), शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) या अष्टपैलू खेळाडूंना प्रभाव पाडता आला नाही. लोकेशने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. नजमुल शांतो गोल्डन डकवर बाद झाला. लिटन दास ( ४१) व अनामुल हक ( १४) यांनी काही काळ संघर्ष केला. शाकिब अल हसन २९ धावांवर माघारी परतल्याने बांगलादेशची चिंता वाढली.  शाकिब आणि लिटन यांची ४८ धावांची भागीदारी  वॉशिंग्टनने संपुष्टात आणली, लोकेश राहुलने भारी कॅच घेतला. लिटन ६३ चेंडूंत ४१ धावांवर माघारी परतला. मोहम्मद सिराजने एका षटकात बांगलादेशचे दोन्ही सेट फलंदाज महमदुल्लाह ( १४) व मुश्फीकर रहीम ( १८) यांना माघारी पाठवून भारताला कमबॅक करून दिले. बांगलादेशने ७ धावांत ४ विकेट्स गमावल्या. 

९ बाद १३६ धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन आणि मुस्ताफिजूर रहमना यांनी ५१ धावांची विक्रमी भागीदारी करून भारतावर १ विकेट्स राखून विजय मिळवला. मेहिदीने उत्तुंग फटका मारला अन् लोकेश हा झेल घेईल असे वाटत असताना त्याच्याकडून कॅच सुटला. मेहिदीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यात क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका यजमानांच्या पथ्यावर पडत होत्या. मेहिदीने नाबाद ३८, तर मुस्ताफिजूरने नाबाद १० धावा करताना बांगलादेशला ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा करून विजय मिळवून दिला. सिराजने तीन, कुलदीप सेन व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


Web Title: IND vs BAN 1st ODI Live Update : KL Rahul’s expensive drop catch of Mehidy Hasan that cost India 1st ODI against Bangladesh, Rohit Sharma furious, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.