IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 07:15 PM2022-12-04T19:15:06+5:302022-12-04T19:16:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st ODI : Bangladesh have defeated India by just 1 wicket, Mehidy Hasan Miraz and Mustafizur Rahman have just shared a remarkable 51-run partnership for the 10th wicket to see their side home | IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ९ बाद १३६ धावांवर असताना आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने (  Mehidy Hasan) अखेरच्या विकेटसोबत झुंज लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मेहिदीला त्यात लोकेश राहुल व वॉशिंग्टन सुंदरने जीवदान दिल्याने रोहित शर्माचा पारा चढला.  

शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना पहिल्या वन डे सामन्यात नाक घासायला भाग पाडले.  रोहित शर्माचा आज चार अष्टपैलू खेळाडूंसह खेळण्याचा प्रयोग फसला. लोकेश राहुल ( KL Rahul) एकटा खिंड लढवत होता. शाकिबने १० षटकांत ३६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. शिखर धवन ( ७), रोहित ( २७), विराट ( ९) आणि  श्रेयस अय्यर ( २४) हे झटपट माघारी परतले. लोकेशने वॉशिंग्टन सुंदरसह ( १९)  ६० धावांची भागीदारी केली. शाहबाज अहमद ( ०), शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) या अष्टपैलू खेळाडूंना प्रभाव पाडता आला नाही. लोकेशने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने चौथी विकेट्स घेताना भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला. 

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. नजमुल शांतो गोल्डन डकवर बाद झाला. कर्णधार लिटन दास व अनामुक हक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद सिराजने धक्का दिला. हक १४ धावांवर बाद झाला. बांगलादेशच्या फलंदाजांनाही धावा करण्यास संघर्ष करावा लागत होता. शाहबाजने टाकलेल्या १३व्या षटकाचा तिसरा चेंडू अप्रतिम होता. लिटन दासच्या बॅटची किनार घेत तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहितच्या दिशेने गेला आणि रोहितने चपळतेने तो चेंडू टीपला. पण, रोहित या झेलबाबत निश्चित नव्हता. लिटन दासही उभाच राहिला आणि मैदानावरील अम्पायरने सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट देत तिसऱ्या अम्पायरची मदत मागितली. रिप्लेमध्ये चेंडू रोहितच्या हातात विसावण्यापूर्वी टप्पा पडल्याचे दिसले आणि लिटन नाबाद राहिला. शाकिब आणि लिटन यांची ४८ धावांची भागीदारी  वॉशिंग्टनने संपुष्टात आणली, लोकेश राहुलने भारी कॅच घेतला. लिटन ६३ चेंडूंत ४१ धावांवर माघारी परतला.


पाठोपाठ शाकिबही २९ धावांवर माघारी परतला, यावेळी विराटने अफलातून कॅच घेतला आणि सुंदरला विकेट मिळाली. बांगलादेशचे फलंदाज एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसले. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दडपण निर्माण केले होते. त्यात मोहम्मद  सिराजने एका षटकात बांगलादेशचे दोन्ही सेट फलंदाज महमदुल्लाह ( १४) व मुश्फीकर रहीम ( १८) यांना माघारी पाठवून भारताला कमबॅक करून दिले. पदार्पणवीर कुलदीप सेनने सातवा धक्का देताना भारताचा विजय निश्चित केला. कुलदीपच्या त्याच षटकात इबादत हुसैन हिट विकेट झाला. त्याने स्वतः पायाचे स्टम्प उडवला. बांगलादेशने ७ धावांत ४ विकेट्स गमावल्या. 

मेहदी हसनने काही चांगले फटके मारून बांगलादेश चाहत्यांच्या आशा कायम राखल्या होत्या. सिराजने १० षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मेहिदीने उत्तुंग फटका मारला अन् लोकेश हा झेल घेईल असे वाटत असताना त्याच्याकडून कॅच सुटला. मेहिदी आणि मुस्ताफिजूर यांनी १०व्या विकेट्ससाठी भारताविरुद्ध सर्वाधिक ३७ धावांची भागीदारी करताना नवा विक्रम नोंदवला. मेहिदीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यात क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका यजमानांच्या पथ्यावर पडत होत्या. दीपक चहरने टाकलेले नो बॉल हेही महागात पडले. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 1st ODI : Bangladesh have defeated India by just 1 wicket, Mehidy Hasan Miraz and Mustafizur Rahman have just shared a remarkable 51-run partnership for the 10th wicket to see their side home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.