Ind vs Aus : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ करतो 'ही' खास गोष्ट, जाणून घ्याल तर हैराण व्हाल...

भारतीय संघ सध्याच्या घडीला बलाढ्य बनला आहे. त्यामुळे जर भारताला कोणत्याही संघाला पराभूत करायचे असेल तर त्यांना विशेष सराव करावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 06:59 PM2020-01-12T18:59:05+5:302020-01-12T18:59:38+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus: The 'special' thing that the Australian team does to defeat India is to be surprised if you know ... | Ind vs Aus : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ करतो 'ही' खास गोष्ट, जाणून घ्याल तर हैराण व्हाल...

Ind vs Aus : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ करतो 'ही' खास गोष्ट, जाणून घ्याल तर हैराण व्हाल...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ काहीही करू शकतो. सध्याच्या घडीला त्यांच्यासमोर आव्हान आहे ते भारताचे. भारताला त्यांच्याच मातीत धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे.

Image result for aus team practice

भारताला त्यांच्या मातीत धूळ चारण्याचे स्वप्न प्रत्येक संघ पाहत असतो. कारण भारतातीलल खेळपट्ट्या आणि वातावरण यांचा अंदाज लवकर येत नाही. त्याचबरोबर भारतीय संघ सध्याच्या घडीला बलाढ्य बनला आहे. त्यामुळे जर भारताला कोणत्याही संघाला पराभूत करायचे असेल तर त्यांना विशेष सराव करावा लागतो.

Image result for aus team practice

ऑस्ट्रेलियाच्या संघाचे भारतात आगमन झाले आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांनी विशेष सराव करायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये दवाचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे सामन्याचा कल बदलू शकतो. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने चेंडू ओला करून सराव करायला सुरुवात केली आहे.

Image result for aus team practice

रोहितबरोबर सलामीला कोण येणार, धवन की राहुल; पाहा प्रशिक्षक काय म्हणाले...

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या मालिकेत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना सलामी करण्याची संधी दिली होती. या दोघांनीही दमदार सलामी दिली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीला नेमकं कोणाला पाठवायचे, हा पेच संघ व्यवस्थापनाला पडलेला आहे.

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलामीला कोण येणार, याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

"श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितला पहिली पसंती देण्यात येईल. पण रोहितबरोबर नेमका कोणता फलंदाज सलामीला येईल," याबाबत सध्या विचार सुरु आहे, असे राठोड यांनी सांगितले.

याबाबत राठोड पुढे म्हणाले की, " श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत धवन आणि राहुल यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता रोहितबरोबर कोणाला खेळवायचे, याबाबत विचार करावा लागेल. संघात चांगलीच स्पर्धा आहे आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे."

Web Title: Ind vs Aus: The 'special' thing that the Australian team does to defeat India is to be surprised if you know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.