India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलनं टीम इंडियाचा डाव सावरला, दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला

India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 07:52 AM2021-01-19T07:52:16+5:302021-01-19T08:01:09+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS : Shubman Gill became a second Youngest visiting players to score a fifty in the fourth innings of a Test in Australia | India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलनं टीम इंडियाचा डाव सावरला, दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला

India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलनं टीम इंडियाचा डाव सावरला, दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहित ( ७) यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पण, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी पहिले सत्र खेळून काढले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून पुजाराला जायबंदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही. लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला, ऑसींनी DRS घेतला असता तर कदाचित त्यालाही तंबूत परतावे लागले असते. पहिल्या सत्रात गिलननं अर्धशतक पूर्ण करून माजी कसोटीपटून दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला.


मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांच्या दणक्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला आणि टीम इंडियासमोर विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य उभे राहिले. गॅबाची खेळपट्टी पाहता हे लक्ष्य सोपं नक्कीच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांचा कस लागणे हे निश्चित आहे. रोहितकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा फोल ठरली. कमिन्सच्या स्वींग चेंडूवर रोहित झेलबाद होऊन माघारी परतला. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळालेल्या गिलनं ऑसींचा समाचार घेतला. त्याचे फटके पाहून सारेच अवाक् झाले. कमिन्स, हेझलवूड यांचा चेंडू बॅकफूटवर जाऊन कव्हरच्या दिशेनं तो सहज टोलवत होता. 

गिलनं या दौऱ्यातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. लंच ब्रेक झाला तेव्हा गिल ६४ आणि पुजारा ८ धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाच्या १ बाग ८३ धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी ६२ षटकांत २४५ धावांची गरज आहे. गिलनं या खेळीसह ऑस्ट्रेलियात कसोटीच्या चौथ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. इजाझ अहमद यांनी २१ वर्षे व ११४ दिवसांचे असताना हा पराक्रम केला होता, गिलनं २१ वर्ष व १३३ दिवसांचा असताना येथे चौथ्या डावात अर्धशतक झळकावले. दिलीप वेंगसरकर यांनी २१ वर्ष व २९७ दिवसांचे असताना ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात अर्धशतक झळकावले होते. 

कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो भारताचा तिसरा युवा फलंदाज ठरला. पृथ्वी शॉ यानं १८ वर्ष व ३२९ दिवसांचा ( पहिला डाव) आणि १८ वर्ष व ३३८ दिवसांचा ( दुसरा डाव) असताना हा पराक्रम केला होता. त्यानंतर माधव आपटे यांचे नाव येते. त्यांनी २० वर्ष व ११४ ( तिसरा डाव) दिवसांचे असताना ही कामगिरी केली होती. 

Web Title: IND vs AUS : Shubman Gill became a second Youngest visiting players to score a fifty in the fourth innings of a Test in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.