WTC Final: उल्लू बनाया... काही न कळताच गिलची 'दांडी गुल', रोहितही फसला (Video)

Rohit Sharma Shubman Gill, WTC Final 2023 IND vs AUS: रोहित-शुबमनने केली निराशा, चहापानापर्यंत भारत २ बाद ३७

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:06 PM2023-06-08T20:06:44+5:302023-06-08T20:07:07+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Shubman Gill got fooled gets clean bowled Rohit Sharma | WTC Final: उल्लू बनाया... काही न कळताच गिलची 'दांडी गुल', रोहितही फसला (Video)

WTC Final: उल्लू बनाया... काही न कळताच गिलची 'दांडी गुल', रोहितही फसला (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Shubman Gill Wicket, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यावर दुसऱ्या दिवस चहापानापर्यंत तरी गोलंदाजांचाच ठरला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तर दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी डाव पलटवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर आटोपल्यानंतर रोहित-गिल जोडीकडून भक्कम सलामीची भारताला अपेक्षा होती. पण रोहित शर्मा १५ धावांवर तर शुबमन गिल १३ धावांवर बाद झाला.

४६९ धावांचे विशाल आव्हान पाहिल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. पण या दोघांनी वेगळीच भूमिका घेतली. रोहित शर्माने सुरूवातीपासून हवेत पुल शॉट खेळायला सुरूवात केली तर शुबमन गिल देखील धावा करण्याच्या दृष्टीने खेळू लागला. याचा फायदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बरोबर उचलला. कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माला बरोबर हाफ पिच चेंडू टाकत स्टंपच्या समोर जाळ्यात अडकवलं आणि LBW केलं. रोहित २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला.

त्यानंतर शुबमन गिलला तर ऑस्ट्रेलियाने चांगलंच उल्लू बनवलं. शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता. स्ट्रोकमेकिंगची चांगली सुरूवात त्याच्या बॅटमधून झाली होती. पण ऑफस्टंपच्या जवळची लाइन ओळखण्यात त्याची चूक झाली. अनेक चेंडू ऑफस्टंपवरून बाहेर जात असल्याने त्याने स्कॉट बोलंडचा तसाच येणारा एक चेंडू सोडून दिला आणि उल्लू बनला. चेंडू टप्पा पडल्यावर आत आला आणि शुबमन गिलचा ऑफस्टंप उडाला. त्यामुळे गिललादेखील १५ चेंडूत १३ धावांवर माघारी जावे लागले.

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा, तर लाबूशेनने २६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने २८५ धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड १७४ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १६३ धावा करून बाद झाला. पाठोपाठ कॅमेरॉन ग्रीन ६ धावांवर माघारी गेला. तर स्टीव्ह स्मिथदेखील २६८ चेंडूत १२१ धावांवर तंबूत गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची शेपूट भारताने झटपट गुंडाळली. अलेक्स कॅरी ४८, मिचेल स्टार्क ५, नॅथन लायन ९ आणि पॅट कमिन्स ९ धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक ४, शमी-शार्दुलने २-२ आणि जाडेजाने १ बळी टिपला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

 

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Shubman Gill got fooled gets clean bowled Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.