ICC World Cup 2019: चहलन सांगितलं 'माही माहात्म्य', धोनीचा 'आदेश' कायमच शिरसावंद्य

ICC World Cup 2019:  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धाराने 22 तारखेला लंडनसाठी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:26 PM2019-05-21T12:26:48+5:302019-05-21T12:27:30+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019:  ‘You need Mahi bhai, we still obey him’, Yuzvendra Chahal on MS Dhoni | ICC World Cup 2019: चहलन सांगितलं 'माही माहात्म्य', धोनीचा 'आदेश' कायमच शिरसावंद्य

ICC World Cup 2019: चहलन सांगितलं 'माही माहात्म्य', धोनीचा 'आदेश' कायमच शिरसावंद्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धाराने 22 तारखेला लंडनसाठी रवाना होणार आहे. इंग्लंडच्या वातावरणात गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात होती, परंतु प्रत्यक्षात येथे पाटा खेळपट्ट्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळेल, अशा परिस्थितीत मधल्या षटकांत विकेट घेणारे गोलंदाज असणे कोणत्याची संघासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. भारतासाठी ही जबाबदारी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू पार पाडणार आहेत.


चहल आणि कुलदीप या जोडीनं गेल्या वर्षभरात भारतासाठी खूप मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या जोडीनं मिळून विकेट्सचे सर्वात जलद शतकही नोंदवले. ''आम्ही एकमेकांना आत्मविश्वास देत असतो. कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि वर्ल्ड कपमध्येही तशीच कामगिरी करायची आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गोलंदाजीत बदल करण्याची गरज नाही,'' असे चहलने सांगितले. 


कुलदीपसोबत असलेल्या संवादाबाबत चहल म्हणाला,'' तो माझा मोठा भाऊ आहे. तुमची कामगिरी समाधानकारक होत नसताना बोलण्यासाठी कोणीतही हवा असतो. अशा वेळी मी कुलदीपशी बोलतो.'' चहलने यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या संघातील उपस्थितीबाबत महत्त्वाचे विधान केले. तो म्हणाला,''सामन्याची परिस्थिती कशीही असो, तुम्हाला धोनीची गरज लागतेच. त्याच्या सल्ल्याचे आम्ही नेहमी पालन करतो. आम्ही चुकतो तेव्हा धोनी लगेच ती सुधारून घेतो. आम्ही काही रणनीती आखली, तरी त्याबाबत धोनीशी संवाद साधतो.''

( धोनीनं दिलेल्या बऱ्याच टिप्स चुकीच्या ठरतात; कुलदीप यादवचे खळबळजनक वक्तव्य ) 

( भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या ) 

 

Web Title: ICC World Cup 2019:  ‘You need Mahi bhai, we still obey him’, Yuzvendra Chahal on MS Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.