ICC World Cup 2019 : Yograj Singh accuses MS Dhoni of purposely losing semi-final against New Zealand | 'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'
'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'

नवी दिल्ली : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या टीकाकारांचे लक्ष्य बनत आहेत. त्यात संथ खेळामुळे धोनीवर अधिक टीका होत आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही जोरदार रंगत आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडूनही ( बीसीसीआय) तसे संकेत मिळत आहेत. भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून 18 धावांनी हार मानावी लागली होती. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करून शर्थीचे प्रयत्नही केले, पण टीम इंडियाच्या पदरी अपयश आले. धोनीनं हा सामना ठरवून गमावल्याचा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे. कोणी केला हा आरोप?

मी धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते, म्हणतोय मास्टर-ब्लास्टर...

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याचे वडील योगराज हे धोनीवर सातत्याने टीका करत आहेत. युवराजची कारकीर्द संपवण्यात धोनीचा हात असल्याचे आरोपही योगराज यांनी अनेकदा केला आहे. आता तर त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना धोनी ठरवून हरल्याचा गंभीर आरोप केला.  धोनीला किवींच्या मार्टिन गुप्तीलनं अप्रतीम थ्रो करून धावबाद केले आणि तेथेच भारताचा पराभव निश्चित झाला. 

... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?

योगराज यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''न्यूझीलंडने ठेवलेले माफक लक्ष्य धोनी पार करू शकला असता, पण त्याची तशी इच्छाच नव्हती. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी भारतीय कर्णधाराने वर्ल्ड कप उचंवावा, हे त्याला नको होते. रवींद्र जडेजा खोऱ्यानं धावा करत होता, त्यावेळी भारत हे लक्ष्य पार करेल असे स्पष्ट चित्र होते. पण, धोनीनं त्यावेळी उपयुक्त खेळी केली नाही.''

येत्या शुक्रवारी ठरणार धोनीचे संघातील स्थान

अंबाती रायुडूच्या तडकाफडकी निवृत्तीपासून ते भारताचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपेपर्यंत योगराज यांनी सातत्यानं धोनीलाच लक्ष्य केले. ते म्हणाले,'' रवींद्र जडेजा कोणत्याही तणावाशिवाय फटकेबाजी करत होता. त्यावेळी धोनी दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत होता. तो 77 धावांवर खेळत असताना धोनी त्याला मोठे फटके मारण्यास सांगत होता. त्यापूर्वी हार्दिक पांड्याला फिरकीपटूंवर फटकेबाजी करण्यास त्यानं सांगितले.''

महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली

''धोनी तू इतकी वर्ष क्रिकेट खेळत आहेस. अशा परिस्थितीत काय करावे, काय करू नये याची जाण तुला नाही? कधी युवराजनं कोणत्याही खेळाडूला अशी फटकेबाजी करण्याचा सल्ला दिला का? तू अनेकदा उत्तुंग षटकार खेचले आहेस मग त्याच सामन्यात काय झाले? तुला कोणती चिंता सतावत होती? तुला बाद होशील असे वाटत होते का? तू संघ जिंकावा म्हणून काय केलेस?,''असे अनेक प्रश्न योगराज यांनी केले.


Web Title: ICC World Cup 2019 : Yograj Singh accuses MS Dhoni of purposely losing semi-final against New Zealand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.