लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हा सध्या इंग्लंडमध्ये हिंदी समाचोलनासाठी गेला आहे. यावेळी हरभजनने एका सुंदरीबरोबर फोटो काढल्याचे पाहायला मिळाले. हे फोटो सोशल मीडीयावर चांगलेच वायरल झाले आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना शनिवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला. या अखेरच्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रिक मिळवत इतिहास रचला. या सामन्यात हरभजन आणि या सुंदरीचे फोटो काढले गेले आणि ते चांगलेच वायरल झाले आहेत.

या सामन्याच्यावेळी हरभजनने अफगाणिस्तानच्या कामगिरीची स्तुती केली होती. कारण या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले होते. त्यामुळे हरभजन अफगाणिस्तानच्या कामगिरीवर खूष होता.

या सामन्याच्या वेळी एक सुंदरी हरभजनची मुलाखत घेत होती. त्यावेळी बऱ्याच लोकांनी या दोघांचे फोटो काढले. ही मुलगी हरभजनचीच मुलाखत का घेत होती, असाही प्रश्न निर्माण झाला. पण या गोष्टीचे उत्तक कुणाकडेही नव्हते. त्यानंतर मात्र हरभजनचे हे फोटो चांगलेच वायरल व्हायला लागले.

या सुंदरीचे नाव दीवा पतांग असल्याचे समजते. दीवा ही अफगाणिस्तानची टीव्ही अँकर आहे. खास अफगाणी पोषाखामध्ये दीवाने आतापर्यंत बऱ्याच मुलाखती घेतल्या आहेत.


Web Title: ICC World Cup 2019: who is the beautiful girl with Harbhajan Singh, Photo Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.