आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार'

वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करेल, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 07:59 PM2019-05-24T19:59:31+5:302019-05-24T20:00:13+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: 'Virat Kohli to be run machine in World Cup' | आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार'

आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपला अजूनही सुरुवात झालेली नाही. पण तरीही भारताचा कर्णधार विराट कोहली रनमशिन ठरेल, असे एका माजी क्रिकेटपटूने सांगितले आहे. आतापर्यंत कोहलीला इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही, पण वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करेल, असे म्हटले जात आहे.

कोहलीला आयपीएलमध्ये सूर गवसला नव्हता. कोहलीच्या संघालाही चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण तरीही इंग्लंडमध्ये कोहलीची फलंदाजी सर्वोत्तम होईल, असे म्हटले जात आहे. पण डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याचबरोबर इंग्लंडच्या जोस बटलरनेही आपली छाप पाडली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ याने सांगितले आहे की, " इंग्लंडच्या वर्ल्डकपमध्ये तीन फलंदाजांच्या बॅटमधून चांगल्या धावा बरसतील. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा विराट कोहली. कारण मोठ्या स्पर्धेत विराटची बॅट चांगली तळपते. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर मी जोस बटलरला स्थान देईल, कारण आतापर्यंत त्याने आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याचबरोबर त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर. कारण वॉर्नरचा हा अखेरचा वर्ल्डकप असेल. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात वॉर्नरला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता आले नव्हते. त्यामुळे या वर्षभरातील धावांचा दुष्काळ वॉर्नर वर्ल्डकपमध्ये भरून काढेल."

...म्हणून कोहली जगातील अन्य फलंदाजांपेक्षा वेगळा, सांगतोय राहुल द्रविड
विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे की जी कोहलीला अन्य दिग्गज फलंदाजांपेक्षा वेगळी बनवते आणि भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडला याच गोष्टीनं प्रभावीत केले आहे. एखाद्या मालिकेत अपयश आल्यानंतर कोहली आपला खेळ सुधरवण्यासाठी आणखी मेहनत घेतो आणि तितकेच दमदार पुनरागमनही करतो; हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते, असे द्रविडने सांगितले. 
द्रविड म्हणाला,''विराट कोहली सातत्याने स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करत आहे. त्याने साध्य केलेले विक्रम कोणालाही मोडणे शक्य नाही, असे आपल्याला वाटत आहे. सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये 49-50 शतकं केली आहेत. लोकांना वाटतं त्यासाठी त्याने बराच वेळ घेतला. तेंडुलकरच्या या विक्रमाजवळ कोणी पोहोचेल, असे वाटले नव्हते आणि कोहली आता फक्त 10 शतकं दूर आहे.'' 

Web Title: ICC World Cup 2019: 'Virat Kohli to be run machine in World Cup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.