ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan and Kuldeep Yadav celebrates a wicket in wildest way,Video  | ICC World Cup 2019 : कुलदीप यादव 'गब्बर'ला चावला, Video पाहून धक्का बसेल
ICC World Cup 2019 : कुलदीप यादव 'गब्बर'ला चावला, Video पाहून धक्का बसेल

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील अपयश मागे सोडून कुलदीप यादव वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात कुलदीपने 3 विकेट घेत, फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. भारताच्या 359 धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाचे तीन फलंदाज कुलदीपने 47 धावा देत माघारी पाठवले. या सामन्यात लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली. 

बांगलादेशचा संपूर्ण संघ 49.3 षटकांत 264 धावांत माघारी परतला. सामन्याच्या 36व्या षटकात कुलदीपने बांगलादेशच्या महमदुल्लाहला बाद केले. या विकेटनंतर कुलदीपने गब्बर शिखर धवनचा चावाच घेतला. त्याच्या या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

पाहा व्हिडीओ...


Web Title: ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan and Kuldeep Yadav celebrates a wicket in wildest way,Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.