ICC World Cup 2019: Sachin had told Williamson that 'this' thing, what exactly did he say? | ICC World Cup 2019 : सचिनने विल्यमसनला सांगितली होती 'ही' गोष्ट, नेमकं म्हणाला तरी काय...
ICC World Cup 2019 : सचिनने विल्यमसनला सांगितली होती 'ही' गोष्ट, नेमकं म्हणाला तरी काय...

लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडने अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडवर मात केली. इंग्लंडने विश्वचषक जिंकला, पण मन जिंकली ती न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विल्यमसनला निवडण्यात आले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते विल्यमसनला पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिनने विल्यमसनशी थोडी बातचीत केली. यावेळी सचिन नेमके विल्यमसनला काय म्हणाला, याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे.

अंतिम सामन्याच्या पारितोषिक वितरणामध्ये सचिनने विल्यमसनला पुरस्कार प्रदान केला. यावेळी सचिनने काही गोष्टी विल्यमसनशी शेअर केल्या. यावेळी सचिन विल्यमसनला म्हणाला की, " तू विश्वचषक जिंकला नसलास तरी चाहत्यांच मने जिंकली आहेस. तुझ्या कामगिरीची साऱ्यांनीच प्रशंसा केली आहे. तुझ्यासाठी हा विश्वचषक शानदार ठरला आहे."

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं?
 क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. या सामन्यानं सर्वांची उत्कंठा ताणून धरली होती. कोण जिंकेल हे अखेरपर्यंत छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नव्हते. त्यामुळेच या सामन्यात दोन्ही संघ अपराजितच राहिले, परंतु अधिक चौकारांमुळे यजमान इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या निर्णयावर सडकून टीका झाली. पण, याच सामन्यात चौकारांची संख्या समान राहिली असती तर कोण जिंकल असतं?

चला जाणून घेऊया...
- सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर ज्या संघांनं 50 षटकं आणि सुपर ओव्हर असे मिळून सर्वाधिक चौकार मारले त्याला विजयी घोषित केले जाते, त्यानुसारच जेतेपदाचा मान इंग्लंडला मिळाला
- याच आधारावर दोन्ही संघांच्या चौकारांची संख्याही समान राहिली असती तर केवळ निर्धारीत 50 षटकांत ज्याचे चौकार जास्त तो विजयी घोषित झाला असता
-  वरील दोन्ही नियमानंतरही दोन्ही संघाच्या चौकारांची संख्या समान राहिली असती तर सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर कोणी किती धावा केल्या, त्यावर विजेता ठरवता आला असता.
-  पण, अखेरच्या चेंडूवर दोन्ही संघांनी समान धाव घेतली असता, पाचव्या चेंडूवरील धावांच्या आधारावर विजेता ठरवला गेला असता. याच प्रकारे सुपर ओव्हरच्या चार चेंडूंत दोन्ही संघाच्या दोन विकेट गेल्या असत्या, तर चौथ्या चेंडूवरील धावांचा आधार घेतला गेला असता.


Web Title: ICC World Cup 2019: Sachin had told Williamson that 'this' thing, what exactly did he say?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.