ICC World Cup 2019: Rohit Sharma accepts steady hand challenge, watch video ... | आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ...
आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ...

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपपूर्वी सरावामध्ये भारतीय संघ वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. सरावाच्या पहिल्याच दिवशी संघाने फुटबॉल खेळला. त्यानंतर संघाने  BIB snatching प्रॅक्टिस केली. त्यानंतर आता तर भारताचा हिटमॅन रोहित शर्माने steady hand challenge स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. याबाबतचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

हा पाहा व्हिडीओ


steady hand challenge म्हणजे नेमके काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपले दोन्ही हात किती वेळ स्थिर राहू शकतात आणि ते एकाग्रतेने किती सावधपणे काम करू शकतात, असे steady hand challenge आहे.

भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस
भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. या सरावामध्ये भारतीय संघाने काही नवीन प्रयोगही केले आहेत. भारतीय संघाने पहिल्याच दिवशी एक प्रयोग केला आणि तो चांगलाच यशस्वी झाल्याचे पाहायाला मिळाले. भारतीय संघाने पहिल्याच सरावाच्या सत्रामध्ये BIB snatching प्रॅक्टिस केली. बीसीसीआयने या BIB snatching प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पण BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल.

बरेच संघ आपल्या सराव सत्रामध्ये बरेच प्रयोग करत असतात. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ खो-खो हा खेळ सराव म्हणून खेळायचे. खो-खोमध्ये सर्वाधिक चपळता लागते, असे म्हटले जाते. त्यानंतर भारतीय संघाने फुटबॉलचा सरावामध्ये समावेश केला. इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघानेही पहिल्या दिवशी फुटबॉलचा सराव केला. त्यानंतर भारतीय संघाने BIB snatching प्रॅक्टिस केली. या प्रक्टिसनंतर खेळाडूंमध्ये चांगलाच हशा पिकला होता. BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हे भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने सांगितले.

हा पाहा व्हिडीओWeb Title: ICC World Cup 2019: Rohit Sharma accepts steady hand challenge, watch video ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.