ICC World Cup 2019 : Rain could affect India vs New Zealand clash in Nottingham, claims report  | ICC World Cup 2019 : ... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण
ICC World Cup 2019 : ... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटींगहॅम, ट्रेंट ब्रिज येथ मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट कोहलीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. पण, भारताच्या या डावपेचावर पाणी फिरण्याची लक्षणं आहेत. 

इंग्लंडमधील लहरी वातावरण लक्षात घेता नॉटींगहॅम येथे गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास भारत-न्यूझीलंड सामना होण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडमध्ये गेले दोन दिवस पाऊस पडत आहे आणि तेथील हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस असेच वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि गुरुवारी दुपारीही हलका पाऊस पडेल. अशा परिस्थितीत तेथील कमाल तापमान 13, तर किमान तापमान 10 ते 11 डिग्री सेल्सियस असणार आहे. 


 

धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार?
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे.


दुखापतग्रस्त धवनला भारतामध्ये पाठवण्यात येणार नाही. धवन हा संघाबरोबर इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याचबरोबर धवनचा पर्यायी खेळाडू तुर्तास तरी निवडण्यात येणार नाही. बीसीसीआयने एक ट्विट केले असून याबाबतची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, टाईम्प ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार धवनची दुखापत गंभीर असून वर्ल्ड कप स्पर्धेतून तो माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला इंग्लंडसाठी रवाना होण्यास सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 


Web Title: ICC World Cup 2019 : Rain could affect India vs New Zealand clash in Nottingham, claims report 
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.