ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण...

ICC World Cup 2019 :विजय शंकरच्या दुखापतीनंतर भारतीय संघात मयांक अगरवालची निवड करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:34 PM2019-07-05T17:34:47+5:302019-07-05T17:35:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Mayank Agarwal touch down at London, Team India welcome new partner | ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण...

ICC World Cup 2019 : नव्या भिडूच्या आगमनानं लोकेश राहुलचा आनंद गगनात मावेना, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विजय शंकरच्या दुखापतीनंतर भारतीय संघात मयांक अगरवालची निवड करण्यात आली. शुक्रवारी मयांक लंडनमध्ये दाखल झाला आणि त्यानं सहाकाऱ्यांसह लंडनचा फेरफटकाही मारला. पण, मयांकच्या येण्यानं सर्वात अधिक आनंद झाला तो सलामीवीर लोकेश राहुलला.भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तसे करावे लागले. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. सलामीवीर शिखर धवननंतर भारताला हा दुसरा मोठा धक्का आहे. भारतीय संघाने शिखरला पर्याय म्हणून रिषभ पंतची, तर विजयला पर्याय म्हणून मयांकची निवड केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी मयांक लंडनमध्ये दाखल झाला आहे. शनिवारी होणाऱ्या या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. पण, पर्यायी सलामीवीर म्हणून त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थिती राहुल चौथ्या क्रमांकावर येईल. मयांक आणि लोकेश हे दोघेही कर्नाटक संघाकडून खेळतात. त्यामुळे मयांकच्या येण्याचा सर्वाधिक आनंद राहुलला झाला. त्यानं मयांकसोबतचा एक फोटो शेअर करून सुंदर मॅसेजही लिहिला आहे.



मयांक अगरवाल कोण?
कर्नाटकच्या या फलंदाजाने गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दोन कसोटीत 2 अर्धशतकांसह 195 धावा केल्या आहेत. पण, त्याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्याचे नाणे खणखणीत वाजले आहे.

मागील 24 महिन्यांतील कामगिरी
मयांकने लिस्ट A क्रिकेमध्ये मागील 24 महिन्यांत  धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 31 डावांत 58.23 च्या सरासरीनं आणि 105.75 च्या स्ट्राईक रेटनं 1747 धाव चोपल्या आहेत. त्यात 7 शतकं व 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडमधील कामगिरी
मयांकने भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना 6 डावांत 88.40च्या सरासरीनं आणि 113.62 स्ट्राईक रेटने 442 धावा चोपल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे.

सलामीला पर्याय ?
मयांकच्या समावेशाने भारतीय संघाला सलामीचा पर्याय मिळणार आहे. तो रोहित शर्मासह सलामीला येऊ शकतो आणि लोकेश राहुल पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. पण, पुढील दोन सामन्यांत रिषभ पंत अपयशी ठरला, तर ही शक्यता आहे.

Web Title: ICC World Cup 2019 : Mayank Agarwal touch down at London, Team India welcome new partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.