ICC World Cup 2019 : India-Pakistan as like other game, say virat kohli; pakistan's captain agree with him | आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान
आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान

लंडन, आयसीसी विश्वचषक 2019 : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उत्सुकता हळुहळू शिगेला पोहचू लागली आहे. या स्पर्धेच्या जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये भारतासह यजमान इंग्लंड आघाडीवर आहे. या दोन्ही संघांची गेल्या वर्षभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे. पण, या स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागले आहे ते भारत-पाकिस्तान लढतीकडे... दोन्ही देशांतील तणावजन्य परिस्थिती पाहता भारत-पाक यांच्यात द्विदेशीय मालिका बंद झाली आहे. आयसीसी स्पर्धेच्या निमित्ताने कट्टर शेजारी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतात आणि त्यामुळेच उभय संघांतील सामन्याची दोन्ही देशांतील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटला की स्टेडियमवर प्रचंड तणावाचे वातावरण असते, परंतु हीच परिस्थिती खेळाडूंच्या मनात असेच का? आणि खेळाडू त्यासाठी कशी तयारी करतात? याची चर्चा रंगलेली आहे.वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत याचे उत्तम मिळाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ते उत्तर दिलं आणि त्याच्या शेजारी बसलेल्या पाकिस्तानच्या कर्णधार सर्फराज अहमदलाही त्यावर मानं डोलवावी लागली. कोहली म्हणाला,''मी याआधीही याबाबत मत व्यक्त केलं आहे. हा सामना इतर सामन्याप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही. आम्ही सर्वच व्यावसायिक खेळाडू आहोता आणि सर्वांना त्यांच्या जबाबदारीची जाण आहे. प्रत्येक खेळाडू विजयासाठी मैदानावर उतरणार आहे. हो पण या सामन्यात स्टेडियमवर तणावाचे वातावरण असते, हे मान्य करायला हवं.'' 

कोहलीनंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराजच्या उत्तराची प्रतीक्षा होती. पण, त्यानं कोहलीच्या उत्तरावर मान डोलावत सहमती दर्शवली. 

पाहा व्हिडीओ

जोफ्रा आर्चर हा इंग्लंडचा X फॅक्टर
इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आले आहे. वर्ल्ड कप संघात निवड होताच आर्चरने भारतीय कर्णधार विराट कोहलीची विकेट घेण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्याबाबत विचारले असता तो म्हणाला,''मला या गोष्टीवर लक्ष द्यायचे नाही. माझे सर्व लक्ष्य हे संघाला विजय मिळवून देण्यावर आहे. पण, जोफ्राचे कौतुक करायला हवं, त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करून वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले आहे. तो इंग्लंडचा X फॅक्टर ठरणार आहे.'' 


 
 


Web Title: ICC World Cup 2019 : India-Pakistan as like other game, say virat kohli; pakistan's captain agree with him
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.