लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंकडून मोठ्या भागीदाऱ्या होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यांना इंग्लंडपुढे 242 धावांचे आव्हान ठेवता आले. पण आतापर्यंतच्या विश्वचषकात फक्त एकाच संघाने आतापर्यंत २४१पेक्षा कमी धावा करून विश्वचषक जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये आणि याच लॉर्ड्सच्या मैदानात झाला होता. त्यामुळे आता त्या विश्वविजयाची पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

ही विश्वचषकाची अंतिम फेरी झाली होती १९८३ साली आणि विश्वविजेता ठरला होता इंग्लंडचा संघ. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग वेस्ट इंडिजला करता आला नव्हता. वेस्ट इंडिजचा डाव १४० धावांवर आटोपला होता आणि भारत विश्वविजेता ठरला होता. आता न्यूझीलंड विश्वचषक जिंकणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

न्यूझीलंडचे इंग्लंडपुढे 242 धावांचे आव्हान
फलंदाजांनी चांगल्या भागीदारी न केल्याचा फटका न्यूझीलंडला अंतिम फेरीत बसला. न्यूझीलंकडून मोठ्या भागीदाऱ्या होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यांना इंग्लंडपुढे 242 धावांचे आव्हान ठेवता आले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. पण सातव्या षटकामध्येच न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर हेन्री निकोल्स आणि केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. पण केन बाद झाला आणि ही भागीदारी मोडीत निघाली. केनला यावेळी ३० धावा करता आल्या. केन बाद झाल्यावर निकोल्सने आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक पूर्ण झाल्यावर निकोल्स जास्त काळ खेळू शकला नाही. निकोल्सने चार चौकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. निकोल्सनंतर टॉन लॅथमने दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. इंग्लंडकडून लायम प्लंकेट हा यशस्वी गोलंदाज ठरला. प्लंकेटने केन, निकोल्स आणि निशाम यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले.

अंतिम फेरीतही सदोष पंचगिरी; रॉस टेलरला ढापला
विश्वचषकातील पंचांची वाईट कामगिरी अंतिम फेरीतहीकायम राहिल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा मोठा फटका न्यूझीलंडच्या संघाला बसू शकतो. कारण पंच माराएस इरॅसमस यांनी न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे आता पुढे आले आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बाद झाल्यावर संघाची मदार टेलरवर होती. टेलरने धावांची गती कायम राखत धावपलक हलता ठेवला होता. टेलर स्थिरस्थावर झालेला दिसत होता. टेलर आता मोठे फटके मारणार असे वाटत होते, पण त्याचवेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्याचा घात केला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने ३३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरला पायचीत पकडले. यावेळी त्यांनी पंचांकडे जोरदार अपील केले. त्यावेळी पंच इरॅसमस यांनी टेलरला बाद ठरवले. न्यूझीलंडकडे रीव्ह्रू नसल्याने टेलरला या निर्णयाविरोधात दाद मागता आली नाही. त्यामुळे मान खाली घालून टेलर माघारी परतला.

टेलर माघारी परतल्यानंतर हा चेंडू पुन्हा दाखवण्यात आला. त्यावेळी वूडचा चेंडू  स्टम्पला लागत नसल्याचे स्पष्टपण दिसत होते. हा चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्यामुळे तो पायचीत बाद देणे, चुकीचे असल्याचे साऱ्यांनी पाहिले. अंतिम फेरीत जर पंचांकडून अशा चुका होत असतील तर खेळाडूंनी पाहायचे कुणाकडे, हा प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत.


Web Title: ICC World Cup 2019: Even after the lower than 241 runs India in 1983 became world champion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.