ICC World Cup 2019: 500 runs will be cross in the World Cup! | ICC World Cup 2019 : अब की बार... वर्ल्ड कपमध्ये एका डावात 500 पार!
ICC World Cup 2019 : अब की बार... वर्ल्ड कपमध्ये एका डावात 500 पार!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषकात पाचशे धावांचा आकडाही पार होऊ शकतो, असे संकेत इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. यंदाच्या विश्वचषकात बरेच विक्रम मोडीत निघतील, असेही आता म्हटले जात आहे.

सध्याचा जमाना हा ट्वेंन्टी-20 क्रिकेटचा आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही 20 षटकांमध्ये काही संघांनी दोनशे धावांचा पल्ला ओलांडला होता. त्यामुळे आता या 50 षटकांच्या सामन्यांमध्ये पाचशे धावा काढणे अशक्यप्राय नसल्याचे म्हटले जात आहे.

टेलिग्राफ आणि नवभारत टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार यंदाच्या विश्वचषकात स्कोअर बोर्डमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 400 धावांपर्यंत स्कोअर बोर्डमध्ये स्केल होती. पण आता ही स्केल वाढवून 500 धावांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला या विश्वचषकात पाचशे धावा होतील, असे वाटत आहे.

याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले आहे की, "
आम्ही स्कोअर बोर्डची स्केल बदलली आहे. कुणास ठावूक या विश्वचषकात 500 धावांचा इतिहासही रचला जाऊ शकतो." 

'वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 'हे' दोन फलंदाज ठरू शकतात डोकेदुखी'
नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावेल, अशी सर्वांनच खात्री आहे. मागील वर्षभरात भारतीय संघाने परदेशात विजयी तिरंगा फडकवला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी एक फलंदाज डोकेदुखी ठरू शकतो, असे स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितले आहे.

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप पटकावली. कारण त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. एक वर्षांची बंदी झेलल्यानंतर तो आयपीएलमध्ये उतरला होता. त्यानंतर मात्र त्याने धावांची टांकसाळच उघडली होती.  वॉर्नर हा भारतासाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा पहिला खेळाडू असेल, असे भुवनेश्वरला वाटते.

याबाबत भुवनेश्वर म्हणाला की, " वॉर्नर हा सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे. पण वॉर्नरबरोबरच वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल भारतासाठी सर्वात जास्त डोकेदुखी ठरू शकतो. कारण हे दोन्ही खेळाडू सामना एकहाती फिरवू शकतात. त्यामुळे हे दोघे भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात."


Web Title: ICC World Cup 2019: 500 runs will be cross in the World Cup!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.