T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Hardik Pandyaनं मैदान सोडलं, BCCIच्या अपडेट्सनंतर टीम इंडियाच्या चिंतेत पडली भर!

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) टीम इंडियाची चिंता आणखी वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:39 PM2021-10-24T22:39:28+5:302021-10-25T09:11:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Hardik Pandya was hit on his right shoulder while batting, He has now gone for scans: BCCI | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Hardik Pandyaनं मैदान सोडलं, BCCIच्या अपडेट्सनंतर टीम इंडियाच्या चिंतेत पडली भर!

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Hardik Pandyaनं मैदान सोडलं, BCCIच्या अपडेट्सनंतर टीम इंडियाच्या चिंतेत पडली भर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 
ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) टीम इंडियाची चिंता आणखी वाढवली आहे. आधीच तंदुरुस्तीच्या कारणामुळे हार्दिक गोलंदाजी करणार नव्हता, त्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला चेंडू लागला. त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी त्याच्या जागी इशान किशन मैदानावर उतरला. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीच्या स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये गेला आहे. ( Hardik Pandya was hit on his right shoulder while batting, He has now gone for scans: BCCI) 

शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं आजच्या सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. 

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Hardik Pandya was hit on his right shoulder while batting, He has now gone for scans: BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.