T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: मोईन अली- आदिल राशिद जोडीनं वेस्ट इंडिजला तालावर नाचवले, इंग्लंडनं दणदणीत विजयासह वर्चस्व गाजवले

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे वेस्ट इंडिजचा खेळ दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:56 PM2021-10-23T21:56:41+5:302021-10-23T21:58:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates :  England beat West Indies by 6 wickets, Moeen Ali and Adil Rashid shine in this match | T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: मोईन अली- आदिल राशिद जोडीनं वेस्ट इंडिजला तालावर नाचवले, इंग्लंडनं दणदणीत विजयासह वर्चस्व गाजवले

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: मोईन अली- आदिल राशिद जोडीनं वेस्ट इंडिजला तालावर नाचवले, इंग्लंडनं दणदणीत विजयासह वर्चस्व गाजवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे वेस्ट इंडिजचा खेळ दिसला. इंग्लंडच्या गोलंदाजांना फक्त तो लहरीपणा ओळखून त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चोख पार पाडली. मोईन अली ( Moeen Ali) व आदिल राशिद ( Adil Rashid) यांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना विंडीजचा डाव ५५ धावांवर गुंडाळला. इंग्लंडच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार करून २०१६च्या फायनलमधील पराभवाची सव्याज परतफेड केली.  

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोइन अलीनं ( Moeen Ali) कर्णधार इयॉन मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला. चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) अष्टपैलू खेळाडूनं गोलंदाजीत छाप पाडताना पहिल्या तीन षटकांत २ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त दणके दिले. ख्रिस वोक्सनं दुसऱ्या षटकात विंडीजचा सलामीवीर एव्हिन लुईसला ( ६) बाद केले, लुईसनं टोलावलेला उत्तुंग चेंडू मोईन अलीनं सुरेखपद्धतीनं झेलला. त्यानंतर मोईन अलीनं गोलंदाजीत कमाल दाखवताना लेंडल सिमन्स ( ३) व शिमरोन हेटमायर ( ९) यांना बाद करून गतविजेत्यांचे कंबरडे मोडले. मोईन अलीनं ४ षटक, १ निर्धाव, १७ धावा, २ विकेट्स अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली.  


हे धक्के कमी होते की काय, टामल मिल्स, ख्रिस जॉर्डन व आदील राशीद यांनीही विंडीजची अवस्था वाईट केली. राशिदनं आंद्रे रसेलची घेतलेली विकेट पाहण्यासारखी होती. एकमेव ख्रिस गेल ( १३) दुहेरी धावसंख्या गाठू शकला.  कर्णधार किरॉन पोलार्ड ( ६) एकटा खिंड लढवेल असे वाटत असताना राशिदनं त्यालाही फिरकीच्या जाळ्यात ओढले. राशिदनं अखेरची विकेट घेत विंडीजचा संपूर्ण संघ ५५ धावांवर माघारी पाठवला. राशिदनं २ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी निचांक धावसंख्या ठरली.   


जेसन रॉय व जोस बटलर ही जोडीच हे माफक लक्ष्य पार करेल, असे वाटत होते. पण, रॉय ११ धावांवर माघारी परतला, त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो ९ धावा करून बाद झाला. रवी रामपॉलनं इंग्लंडच्या रॉयला ख्रिस गेलकरवी झेलबाद केले आणि गेलची ही ट्वेंटी-२०तील १००वी कॅच ठरली. अकील होसैननं त्याच्याच गोलंदाजीवर बेअरस्टोची कॅच टिपली. मोईन अलीही उगाच घाई करून ३ धावांवर धावबाद झाला. विंडीज पराभवाच्या उंबरठ्यावर असताना होसैननं एक अफलातून झेल घेतला. लाएम लिव्हिंगस्टोन ( १) स्वस्तात माघारी परतला. होसैननं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडनं हा सामना ६ विकेट्स राखून सहज जिंकला. बटलर २४ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ८.२ षटकांत ४ बाद ५६ धावा केल्या. 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates :  England beat West Indies by 6 wickets, Moeen Ali and Adil Rashid shine in this match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.