IND vs NZ, 1st T20I : पहिल्या ट्वेंटी-२०आधी लोकेश राहुलला बसला धक्का; मालिकेत अपयशी ठरला तर...

India vs New Zealand, 1st T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश विसरून टीम इंडिया आजपासून ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:24 PM2021-11-17T15:24:17+5:302021-11-17T15:25:02+5:30

whatsapp join usJoin us
ICC Player Rankings: No Indian in top five, Babar Azam tops T20I batting rankings, KL Rahul in 6th Place | IND vs NZ, 1st T20I : पहिल्या ट्वेंटी-२०आधी लोकेश राहुलला बसला धक्का; मालिकेत अपयशी ठरला तर...

IND vs NZ, 1st T20I : पहिल्या ट्वेंटी-२०आधी लोकेश राहुलला बसला धक्का; मालिकेत अपयशी ठरला तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश विसरून टीम इंडिया आजपासून ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यात केन विलियम्सन व कायले जेमिन्सन हे स्टार खेळाड नसले तरी त्यांना कमी लेखण्याची चूक टीम इंडियाचा करून चालणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे आणि खेळाडूंना आपली कामगिरी उंचावण्याची संधी आहे. पण, पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याला धक्का बसला आहे. जर त्यानं या मालिकेत कामगिरी उंचावली नाही, तर त्याचे आणखी नुकसान होऊ शकते.

ICC Ranking : आयसीसीनं आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं अव्वल स्थान कायम राखले आहे, तर टॉप फाईव्हमध्ये एकाही भारतीय फलंदाजाला स्थान पटकावता आलेले नाही. बाबर ८३९ गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा यानंही गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अग्रस्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये व अष्टपैलू खेळाडूंमध्ये टॉप टेनमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.

ICC Ranking : पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे यांनी या क्रमवारीत मोठी झेप घेत टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध कॉनवेनं ४६ धावांची खेळी केली होती आणि त्यामुळे तो तीन स्थान वर सरकला आहे. मोहम्मद रिझवाननं भारताच्या लोकेश राहुलला मागे टाकताना पाचव्या क्रमांकावर पकड घेतली. लोकेश सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. विराट कोहली आठव्या क्रमांकावर कायम आहे. टॉप टेन फलंदाजांमध्ये दोनच भारतीय खेळाडू आहेत. 

ICC Ranking :  श्रीलंकेच्या वनिंदूनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर गेला. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पाननं दोन क्रम सुधारणा करताना तिसऱ्या स्थानी झेप घेतली. इंग्लंलडचा आदिल राशीद चौथ्या आणि अफगाणिस्तनचा राशिद खान पाचव्या क्रमांकावर घसरला.   

Web Title: ICC Player Rankings: No Indian in top five, Babar Azam tops T20I batting rankings, KL Rahul in 6th Place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.