मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप... इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण? इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आयोजन केले होते. पण, यंदाचा इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता हा वर्ल्ड कप तेच जिंकणार असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यामुळेच या दोन संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यांच्या तिकिटांची किंमतही अन्य संघांच्या तुलनेत अधिक आहे. 
30 मे ते 14 जुलै या कालावधीत 48 सामने होणार आहेत. या सामन्यांच्या 8 लाख तिकिटांसाठी 148 देशांतून जवळपास 3 कोटी अर्ज आले आहेत. हे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या तिकिटांचा काळाबाजार होऊ नये याकरिता आयोजन करडी नजर ठेवून आहेत. भारत आणि इंग्लंडच्या चाहत्यांना तिकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. या स्पर्धेतील सर्वात स्वस्त तिकीट हे 40 डॉलर म्हणजेच 3500 रुपयांचे आहे, परंतु ही किंमत केवळ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्यासाठी आहे. 
महत्त्वाच्या सामन्यांसाठी चाहत्यांना 5000 ते 6200 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वाधिक तिकिटांची किंमत ही 9000 पर्यंत आहे. आयसीसीने जवळपास 80 हजार तिकिटांची किंमत 1800 किंवा त्यापेक्षा कमी आणि 2 लाख तिकिटांची किंमत 4500 किंवा त्यापेक्षा कमी ठेवली आहे. 

बेटिंग जोरात... भारत नव्हे, 'या' संघाला पंटर्सची पसंती; पण विराट, बुमराचीही 'चलती'
Economic Timesनं दिलेल्या वृत्तानुसार यजमान इंग्लंडला पंटर्सची पहिली पसंती आहे. इंग्लंडवर 15/8 असा सट्टा सुरू आहे, तर भारतावर 3/1 आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर 9/2 असा भाव सुरू आहे. इंग्लंडच्या बाबतीत सट्टा समजावून सांगायचा झाल्यास लावलेली रक्कम 15 ने गुणायची आणि नंतर 8 ने भागायची. उदाहरण द्यायचे झाल्यास जर तुम्ही इंग्लंडवर 50,000 लावलेत तर तुम्हाला (50,000 x 15)/8 +50,000 = 1,43,750 इतकी रक्कम मिळेल. या क्रमवारीत  अफगाणिस्तान  100/1 तळावर आहे. 


Web Title: ICC Cricket World Cup 2019 Ticket price, how to book and other details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.