Hyderabad Rape-Murder Case : विराट कोहली भडकला; पाहा काय म्हणाला...

भारताचा कर्णधार विराट कोहलीही या प्रकरणावर चांगलाच भडकला असून त्याचे आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 05:46 PM2019-12-01T17:46:03+5:302019-12-01T17:46:52+5:30

whatsapp join usJoin us
Hyderabad Rape-Murder Case: Virat Kohli See what said ... | Hyderabad Rape-Murder Case : विराट कोहली भडकला; पाहा काय म्हणाला...

Hyderabad Rape-Murder Case : विराट कोहली भडकला; पाहा काय म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीही या प्रकरणावर चांगलाच भडकला असून त्याचे आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

विराटने या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, " हा लाजीरवाणा प्रकार आहे. आपण एक समाज म्हणून या गोष्टींचा विरोध करायला पुढे आले पाहिजे आणि या अमानवी कृत्य थांबवली पाहिजे." 

सायबराबाद पोलिसांनी तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत याप्रकरणात सायबराबादच्या पोलीस आयुक्तांनी एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला होता. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, '27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री एक महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात शमशाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप झाला होता. त्याची सखोल चौकशी केली. या प्रकरणी हलगर्जी झाल्याचं चौकशीतून आलं आहे. त्याआधारे उपनिरीक्षक एम. रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणुगोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.' 

 

पीडितेच्या कुटुंबीयांनी सायबराबाद पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली असती तर कदाचित पीडितेचा जीव वाचवता आला असता, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित तरुणीने आराडाओरडा केला असता तिचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी पीडितेला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पीडिता शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेला काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितेनं फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.

दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दूधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितेचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Hyderabad Rape-Murder Case: Virat Kohli See what said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.