रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज

मनिष पांडेचे दमदार अर्धशतक । कोलकाता नाईट रायडर्सचा अचूक मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 01:19 AM2020-09-27T01:19:23+5:302020-09-27T01:20:04+5:30

whatsapp join usJoin us
Hyderabad batsmen stumbled after missing the strategy in IPL | रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज

रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी : अडखळत्या सुरुवातीनंतर मनिष पांडे आणि रिद्धिमान साहा यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण ६२ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २० षटकांत ४ बाद १४२ धावांची मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतरही हैदराबादला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

मनिष पांडेने केलेल्या ३८ चेंडूंतील ५१ धावांच्या खेळीमुळे हैदराबादला समाधानकारक मजल मारता आली. साहाने ३१ चेंडूंत ३० धावा केल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध अत्यंत महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यावेळी भलत्याच मूडमध्ये दिसला. त्याने सुरुवातीपासून टिच्चून मारा करत हैदराबादच्या सलामीवीरांना केवळ जखडवूनच ठेवले नाही, तर जॉनी बेयरस्टॉचा महत्त्वाचा बळीही मिळवला. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानेही अचूक मारा करताना धोकादायक डेव्हिड वॉर्नरला तंबूची वाट दाखवली. दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाताच्या गोलंदाजांनी अधिक नियंत्रित मारा करत हैदराबादला फटकेबाजीपासून दूर रोखले.

दोन्ही संघांनी यंदाचा आपला पहिला सामना गमावलेला असल्याने हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धेत विध्वंसक सलामी जोडी हैदराबादकडे असल्याने या जोरावर आक्रमक सुरुवात करुन कोलकातावर दडपण आणण्याची योजना हैदराबादची होती. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. कोलकाताने शानदार गोलंदाजी केली. शिवम मावी, कमलेश नागरकोटी या युवा वेगवान गोलंदाजांनीही नियंत्रित मारा करत हैदराबादला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.


षटकात हैदराबादने एका गडयाच्या मोबदल्यात केवळ ३३ धावा केल्या. कमिन्सने जॉनी बेयरेस्टो याला चौथ्या षटकात माघारी धाडले.
व्या षटकाअखेर हैदराबादची वाटचाल २ बाद ६१ अशी होती. मनीष पांडे आणि साहा यांनी पडझड थांबवून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. दहाव्या षटकात पहिल्याच चेंडूवर वरुण चक्रवर्ती याने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला बाद केले.
व्या षटकात या संघाने ९९ पर्यंत मजल गाठली होती. केकेआरच्या सर्वच गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवल्यामुळे त्यांना मोठी फटकेबाजी करता आली नव्हती. खेळपट्टीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title: Hyderabad batsmen stumbled after missing the strategy in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.