The Hundred : 5 चेंडूंचे षटक, 25 चेंडूंचा पॉवर प्ले; क्रिकेटचा नवा फॉरमॅट अन् पहिल्याच सामन्यात भारताच्या हरमनप्रीत कौरची चमक

The Hundred या क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला बुधवारपासून सुरुवात झाली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं 100-100 चेंडूंच्या सामन्यांचा शोध लावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:48 PM2021-07-22T15:48:24+5:302021-07-22T15:48:54+5:30

whatsapp join usJoin us
The Hundred: Major rule changes in ECB's franchise competition; Harmanpreet Kaur 29 runs from 16 balls including 6 fours | The Hundred : 5 चेंडूंचे षटक, 25 चेंडूंचा पॉवर प्ले; क्रिकेटचा नवा फॉरमॅट अन् पहिल्याच सामन्यात भारताच्या हरमनप्रीत कौरची चमक

The Hundred : 5 चेंडूंचे षटक, 25 चेंडूंचा पॉवर प्ले; क्रिकेटचा नवा फॉरमॅट अन् पहिल्याच सामन्यात भारताच्या हरमनप्रीत कौरची चमक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

The Hundred या क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला बुधवारपासून सुरुवात झाली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं 100-100 चेंडूंच्या सामन्यांचा शोध लावला अन् पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) हीनं 180+च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. ओरिजिनल्स विरुद्ध इनव्हिजीबल ( MANCHESTER ORIGINALS vs OVAL INVINCIBLES ) असा हा महिलांच्या The Hundred स्पर्धेचा सलामीचा सामना रंगला ( The Hundred Women's Competition). यात इनव्हिजीबल संघानं 5 विकेट्स व 2 चेंडू राखून विजयाची नोंद केली.

दीपक चहर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला म्हणाला भारताचा 'गुंडा', जाणून घ्या नेमकं काय झालं!

ओरिजिनल्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूंत 6 बाद 135 धावा केल्या. लिझली ली हिनं 39 चेंडूंत 6 चौकारांसह 42 धावा केल्या. हरमनप्रीतनं 16 चेंडूंत 6 चौकारांसह 29 धावा कुटल्या. जॉर्जी बोएस ( 21) हीनंही योगदान दिले. इनव्हिजीबलच्या टॅश फरंटनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इऩव्हिजीबलचे आघाडीचे चार फलंदाज 36 धावांत माघारी परतले. कॅट क्रॉसनं तीन विकेट्स घेतल्या. पण, कर्णधार डॅन व्हॅन निएकर्कनं 42 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराह 56 धावा करताना संघाचा विजय पक्का केला. मॅरीझने कॅप्प हिनं 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा चोपल्या. मॅडी व्हिलियर्सनं 8 चेंडूंत 16 धावा कुटल्या.

जाणून घेऊयात स्पर्धेचे नियम ( The Hundred Rules)
- 100 चेंडू प्रती डाव
- 5 चेंडूंचे एक षटक
- 25 चेंडूंचा पॉवर प्ले
- पॉवर प्लेमध्ये दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर
- 10 चेंडूंनंतर एड्स बदलले जाणार
- एकाचवेळी गोलंदाज 5 किंवा 10 सलग चेंडू फेकू शकतो
- एका गोलंदाजाला फक्त 20 चेंडू टाकण्याची मुभा
- 65 मिनिटांत 100 चेंडू न फेकल्यास दंड
-  सामना बरोबरीत सुटल्यास सुपर फाईव्ह षटक  

Web Title: The Hundred: Major rule changes in ECB's franchise competition; Harmanpreet Kaur 29 runs from 16 balls including 6 fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.