मुंबई पोलीस दलाचा ‘हेलिकॉप्टर शॉट’; विश्वविजयाच्या क्षणाचा उपयोग करून दिला ‘घरीच बसण्याचा’ संदेश

मुंबई पोलिसांनी महेंद्रसिंह धोनीच्या विजयी शॉटचे दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:43 AM2020-04-04T00:43:12+5:302020-04-04T00:43:26+5:30

whatsapp join usJoin us
Helicopter shot of Mumbai police force; The message of 'sit at home' used the moment of globalization | मुंबई पोलीस दलाचा ‘हेलिकॉप्टर शॉट’; विश्वविजयाच्या क्षणाचा उपयोग करून दिला ‘घरीच बसण्याचा’ संदेश

मुंबई पोलीस दलाचा ‘हेलिकॉप्टर शॉट’; विश्वविजयाच्या क्षणाचा उपयोग करून दिला ‘घरीच बसण्याचा’ संदेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन तोडून बाहेर पडणाऱ्यांच्या पाठीवर काठीचे फटके मारणाºया पोलीस दलाने टिष्ट्वटरवरूनही घरीच बसण्याचा संदेश दिला आहे. भारताने २०११ मध्ये क्रिकेट विश्वविजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंह धोनीने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. याच क्षणाचे छायाचित्र टिष्ट्वटर पोस्ट करून मुंबई पोलिसांनी कोरोना हरवायचे असेल तर घरीच बसा असा संदेश दिला आहे.

मुंबई पोलिसांनी महेंद्रसिंह धोनीच्या विजयी शॉटचे दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात टॅगलाईन दिली आहे की, भारताला कोरोनाला याच पद्धतीने संपवायचे आहे.

२ एप्रिल २०११ आम्ही तोपर्यंत घरीच बसलो होतो. जोपर्यंत भारत आपल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत नाही.’ आणि दुसºया फोटोच्या खाली म्हटले आहे की, २ एप्रिल २०२० आम्ही घरीच बबसलो आहोत. कारण भारत लक्ष्याचा पाठलाग करत आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत.’

दुसºया फोटोत बॉलच्या ऐवजी कोरोनाचे चित्र लावण्यात आले आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २ एप्रिल २०११ ला मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता.

Web Title: Helicopter shot of Mumbai police force; The message of 'sit at home' used the moment of globalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.