चिमुकलीचा अफलातून 'हेलिकॉप्टर' शॉट, माजी फलंदाजाने शेअर केला Video

आकाशने 7 वर्षीय परी शर्माचा व्हिडिओ शेअर करत थर्स डे थंडरबोल्ट असं लिहिलंय. अवर ओन परी शर्मा, हे सुपर टॅलेंटेड नाही का? असं कॅप्शनही आकाश चोप्राने दिलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 08:25 PM2020-08-14T20:25:16+5:302020-08-14T20:28:27+5:30

whatsapp join usJoin us
Helicopter shot from the 7 year girl, shared by the former opener batsman of Team India | चिमुकलीचा अफलातून 'हेलिकॉप्टर' शॉट, माजी फलंदाजाने शेअर केला Video

चिमुकलीचा अफलातून 'हेलिकॉप्टर' शॉट, माजी फलंदाजाने शेअर केला Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआकाशने 7 वर्षीय परी शर्माचा व्हिडिओ शेअर करत थर्स डे थंडरबोल्ट असं लिहिलंय. अवर ओन परी शर्मा, हे सुपर टॅलेंटेड नाही का? असं कॅप्शनही आकाश चोप्राने दिलंय.

मुंबई - महेंद्रसिंह धोनी म्हटलं की हेलिकॉप्टर शॉट अन् हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की माहीच, असं समीकरण क्रिकेट चाहत्यांना माहितीय. मात्र, एका 7 वर्षीय मुलीने चक्क धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज आकाश चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

आकाशने 7 वर्षीय परी शर्माचा व्हिडिओ शेअर करत थर्स डे थंडरबोल्ट असं लिहिलंय. अवर ओन परी शर्मा, हे सुपर टॅलेंटेड नाही का? असं कॅप्शनही आकाश चोप्राने दिलंय. आकाशनंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसैन, मायकल वॉन, मायकल आथर्टन यांनीही हा व्हिडिओ रिट्वीट करुन प्रतिक्रिया दिलीय.     

सोशल मीडियावरही अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी रिट्विट केलाय. या मुलीचा हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे हा हेलिकॉप्टर शॉट पाहताना कॉमेंटेटरने परी शर्माला रॉकेट गर्ल म्हटलंय. 

Web Title: Helicopter shot from the 7 year girl, shared by the former opener batsman of Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.