भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानचा नुकताच 41वा वाढदिवस झाला. अनेक क्रिकेटपटूंनी झहीरला शुभेच्छा दिल्या. पण, हार्दिक पांड्यानं दिलेल्या शुभेच्छाची अधिक चर्चा रंगली. हार्दिक सध्या शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिककडे बराच फावला वेळ आहे. त्यामुळेच तो सोशल मीडियावर अधिक सक्रीय दिसत आहे. झहीरला शुभेच्छा देताना हार्दिकनं मस्करी केली आणि त्याला ही मस्करी चांगलीच महागात पडली आहे.

Happy Birthday Zaheer Khan : झहीर-सागरिकाचं लग्न एका CDनं जमवलं

झहीरला शुभेच्छा देताना हार्दिकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात हार्दिकनं झहीरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचलेला पाहायला मिळत आहे. त्यावरून हार्दिकनं माजी गोलंदाजाची फिरकी घेतली. हार्दिकनं लिहिलं की, आशा करतो की तूही असा फटका मारशील, जसा मी या व्हिडीओत मारला आहे.'' हार्दिकची ही मस्करी झहीरनं जरी मनावर घेतली नसली तरी चाहत्यांनी हार्दिकला शिस्तीचे धडेच शिकवले.


चाहत्यांचा संताप
 
Video : हार्दिकची तंदुरुस्तीसाठी धडपड; व्हिलचेअरवरील फोटो पाहून सोशल मीडियावर हळहळ
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर नुकतीच इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिकला दुखापतीनं ग्रासले होते. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-20 मालिकेत तो खेळला, पण कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियेसाठी निघून गेला आणि आता तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे.


हार्दिकची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही तो खेळला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिकने माघार घेतली होती. पण आता त्याच्या दुखापतींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हार्दिकला आता शस्त्रक्रिया करावी लागणार होती. 

आशिया चषकात  पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिकला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

पाहा व्हिडीओ...

Web Title: Hardik Pandya trolled by fan's on his Zaheer Khan birthday Wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.