हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 09:59 AM2020-12-11T09:59:06+5:302020-12-11T09:59:46+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandey should be included in Test squad: Shane Warne | हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न

हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. ऑस्ट्रेलिया खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी हार्दिकला संघात स्थान मिळालेले नाही. 
संघात अष्टपैलू म्हणून स्थान मिळविणारा पांड्या सध्या गोलंदाजीसाठी फिट नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून तो खेळला होता. पण, तो गोलंदाजी करीत नसल्यामुळे कसोटी संघात त्याची निवड झाली नाही. पण, दुसऱ्या टी-२० लढतीत विजय मिळविल्यानंतर या खेळाडूने आशा पल्लवीत केल्या होत्या. जर संघव्यवस्थापनाला वाटत असेल तर कसोटी मालिकेसाठी थांबण्याची माझी तयारी आहे, असे पांड्याने म्हटले होते. 
तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान समालोचन करताना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननेही हेच मत व्यक्त केले. तो म्हणाला, पांड्यासारखा खेळाडू कसोटी संघात असायला हवा. त्याने गमतीने म्हटले की, भारतीय फॅन्सने त्याला संघात स्थान मिळवून देण्यासाठी अर्ज द्यायला हवा. समालोचनानंतर शेन वॉर्नने ट्विटरवर पांड्याबाबत मत मागितले.   

एका फॅनने वॉर्नच्या समालोचनातील लाईनला टॅग करीत पोस्ट केले,‘हार्दिक पांड्या भारतीय कसोटी संघात असायला हवा. त्याच्यात संघातील खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. तो संघातील माहोल सकारात्मक करण्यात यशस्वी ठरतो. क्रिकेटला त्याच्यासारख्या कॅरेक्टर व सुपरस्टारची गरज आहे.’

Web Title: Hardik Pandey should be included in Test squad: Shane Warne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.