मुंबई इंडियन्सनं पांड्या बंधू अन् बुमराह यांच्यात भरवला सामना, कोण मारेल बाजी?

मुंबई इंडियन्सनं संघातील खेळाडूंमध्येच स्पर्धा भरवली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:35 PM2019-11-28T16:35:01+5:302019-11-28T16:35:42+5:30

whatsapp join usJoin us
Hardik & Krunal with the bat Vs Bumrah with the ball, Who wins? Mumbai Indians aks question | मुंबई इंडियन्सनं पांड्या बंधू अन् बुमराह यांच्यात भरवला सामना, कोण मारेल बाजी?

मुंबई इंडियन्सनं पांड्या बंधू अन् बुमराह यांच्यात भरवला सामना, कोण मारेल बाजी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सनेही युवराज सिंगला डच्चू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचवेळी मुंबईनं ट्रेंट बोल्टला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण, आता मुंबई इंडियन्सनं संघातील खेळाडूंमध्येच स्पर्धा भरवली आहे. त्यामुले हार्दिक व कृणाल पांड्या विरुद्ध जसप्रीत बुमराह असा सामना पाहायला मिळणार आहे. 

IPL 2020त मुंबई इंडियन्सचे 'हे' अकरा खेळाडू ठरतील भारी

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील मोसमासाठीच्या संघातून युवराज सिंगला वगळले. युवीसह मुख्यने एव्हीन लुईस, ॲडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरींदर सरन, बेन कटींग आणि पंकज जैस्वालला करारमुक्त केले. पण, मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट आणि धवल कुलकर्णी या दोन गोलंदाजांना ट्रेडमधून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) सर्वाधिक चार जेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. 

Video: टीम इंडियासाठी खूशखबर; हार्दिक पांड्या पुन्हा मैदानावर परतला

बोल्टला आपल्या ताफ्यात घेत मुंबईनं आपल्या जलदगती गोलंदाजीचा मारा अधिक भेदक केला आहे. जसप्रीत बुमराह हा मुंबईचा प्रमुख गोलंदाज, तर हार्दिक हा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. हे दोघंही सध्या तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेत आहेत. गुरूवारी हे तिघेही एकत्र दिसले. त्यावरून मुंबई इंडियन्सनं पांड्या बंधू विरुद्ध जसप्रीत बुमराह हा सामना भरवला. मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं की,'' 6 चेंडूंत 12 धावा हव्या आहेत. एकीकडे हार्दिक किंवा कृणाल पांड्याची फलंदाजी विरुद्ध बुमराहची गोलंदाजी. कोण मारणार बाजी?''


 

Web Title: Hardik & Krunal with the bat Vs Bumrah with the ball, Who wins? Mumbai Indians aks question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.