सौरव गांगुलीनं मेहनतीनं संघ तयार केला अन् त्याचं फळ MS Dhoniला मिळालं; गौतम गंभीरचा दावा

कसोटीत धोनीला सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनवण्यात झहीर खानचा मोठा वाटा असल्याचे गंभीरने म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:29 PM2020-07-11T18:29:06+5:302020-07-11T18:29:49+5:30

whatsapp join usJoin us
Goutam Gambhir believes MS Dhoni was a 'very lucky' captain | सौरव गांगुलीनं मेहनतीनं संघ तयार केला अन् त्याचं फळ MS Dhoniला मिळालं; गौतम गंभीरचा दावा

सौरव गांगुलीनं मेहनतीनं संघ तयार केला अन् त्याचं फळ MS Dhoniला मिळालं; गौतम गंभीरचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात महान आणि यशस्वी कर्णधार आहे, यात दुमत नाही. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. त्यासाठी त्याला राजीव गांधी खेल रत्न, पद्म श्री आणि पद्म भुषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. 

शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय" 

सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्याआधी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून धोनीची ओळख होती. त्यानं आयसीसी कसोटी मानचिन्ह पटकावला आणि हा मान मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. पण, धोनीच्या या यशात माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मेहनतीचं फळ असल्याचे मत, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं व्यक्त केलं. तीनही फॉरमॅटमध्ये त्याला सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा असलेले खेळाडू मिळाले आणि त्यामुळे तो नशिबवान कर्णधार आहे, असे गंभीर म्हणाला.

भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यानं मेहनत घेतली आणि त्याचं फळ धोनीला मिळालं, असा दावाही गंभीरनं केला. तो म्हणाला,''तीनही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळाडू असलेला संघ मिळाल्यानं धोनी हा सर्वात नशीबवान कर्णधार आहे. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करणं सोपं होतं, कारण त्या संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मी, युवराज सिंग, युसूफ पठाण, विराट कोहली आदी खेळाडू होती. हा संघ तयार करण्यासाठी गांगुलीनं प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळेच धोनी एवढे चषक जिंकू शकला.''

कसोटीत धोनीला सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनवण्यात झहीर खानचा मोठा वाटा असल्याचे गंभीरने म्हटले. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 33 सामन्यांत झहीरनं 123 विकेस्ट घेतल्या आणि 2009मध्ये भारतानं कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral  

Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

धक्कादायक : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला झाला कोरोना

कपिल देव, गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला बेन स्टोक्स, नोंदवला विक्रम

Web Title: Goutam Gambhir believes MS Dhoni was a 'very lucky' captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.