आनंदाची बातमी! सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा वानखेडेवर उतरणार...

सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:42 PM2020-02-13T15:42:19+5:302020-02-13T15:53:08+5:30

whatsapp join usJoin us
Good news! Sachin Tendulkar will once again will play on Wankhede stadium | आनंदाची बातमी! सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा वानखेडेवर उतरणार...

आनंदाची बातमी! सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा वानखेडेवर उतरणार...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या मैदानामध्ये माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्याच वानखेडे स्टेडियमवर तो पुन्हा एकदा खेळायला उतरणार आहे.

सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. त्यामुळे जवळपास सात वर्षांनी सचिनच्या फलंदाजीची नजाकत वानखेडेवर पाहायला मिळणार आहे.

Image result for sachin tendulkar retirment

सचिन नोव्हेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर काही प्रदर्शनीय सामन्यांमध्ये सचिन खेळला होता. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिनने एकही सामना खेळला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी तब्बल पाच वर्षांनी सचिन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान तेंडुलकर चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाला.

या सामन्यापूर्वी सचिनने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली होती. तेंडुलकर म्हणाला होता की,''मलाही ही संकल्पना आवडली. मला मैदानावर उतरून एक षटक खेळायला नक्की आवडेल. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे, तरीही मी खेळेल. तुमच्या संकल्पनेतून आशा करतो की आपण पुरेसा निधी गोळा करू शकू.''

Image result for sachin tendulkar retirment

या सामन्यातील पाँटिंग एकादश संघाचे प्रशिक्षकपद सचिनकडे देण्यात आले होते. पण सचिन या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम होता. पण आपण या सामन्यात खेळणार असल्याचे सचिन सांगत हा संभ्रम दूर केला होता. सचिनबरोबर यावेळी वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारादेखील यावेळी उपस्थित होता. बऱ्याच दिवसांनी हे दोन दिग्गज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच होती.

सचिन वानखेडेवर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे सामने खेळायला उतरणार आहे. या सीरिजमध्ये एकूण अकरा सामने खेळवण्यात येणार आहे. यावेळी भारताच्या संघात सचिनबरोबर वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह, झहीर खानदेखील पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या संघात ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल हे दिग्गज खेळाडू दिसणार आहेत.

Web Title: Good news! Sachin Tendulkar will once again will play on Wankhede stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.