चाहत्यांसाठी खूष खबर, 'हा' अष्टपैलू खेळाडू झाला संघात दाखल

चाहत्यांना हा अष्टपैलू संघात दाखल झाल्याने आनंद झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:24 PM2019-12-25T16:24:54+5:302019-12-25T16:26:44+5:30

whatsapp join usJoin us
Good news for the fans, England's all rounder player Ben Stokes back in a team | चाहत्यांसाठी खूष खबर, 'हा' अष्टपैलू खेळाडू झाला संघात दाखल

चाहत्यांसाठी खूष खबर, 'हा' अष्टपैलू खेळाडू झाला संघात दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला लावणारा खेळाडू संघात दाखल झाला आहे. हा अष्टपैलू खेळाडू संघात कधी दाखल होणार, याची वाट पाहत होते. त्यामुळे चाहत्यांना हा अष्टपैलू संघात दाखल झाल्याने आनंद झाला आहे.

वैद्यकीय कारणांमुळे या अष्टपैलू खेळाडूला संघ सोडावा लागला होता. त्यामुळे यापुढे नेमके काय होणार, हा खेळाडू संघात नेमका कधी परतणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर हा खेळाडू संघात परतल्याचे पाहायला मिळाले आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दक्षिण आफ्रिकेला गेला होता. स्टोक्सच्या वडिलांचा गंभीर आजार झाल्यामुळे त्यांना जोहान्सबर्ग येथील हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची तब्येत सुधारली आहे. त्यामुळे स्टोक्स आता इंग्लंडचा संघात परतला असून त्याने सरावात सहभाग घेतला आहे.

Ben Stokes

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे वडील गेड यांना जोहान्सबर्ग येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना गंभीर आजार झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्टोक कुटुंबियांसह गेड दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले होते, परंतु त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

बेन स्टोक्स आता जोहान्सबर्ग येथे वडिलांसोबत असेल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या सराव सत्रात त्यानं सहभाग घेतलेला नाही. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार आहे. पण, आता या सामन्यात स्टोक्स खेळणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही. गेड हे न्यूझीलंडचे माजी रग्बीपटू आहेत.

Web Title: Good news for the fans, England's all rounder player Ben Stokes back in a team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.